इंटिरियर डिझाइनिंग करण्यासाठी काय करावे How to Become a Interior Designer in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, कारण आजची पोस्ट नवीन पिढीसाठी किंव्हा ज्यांना इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी खूप स्पेशल व मदतदायी असणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करावे | इंटिरिअर डिझायनिंग म्हणजे काय|  इंटिरियर डिझाइनिंग करण्यासाठी काय करावे.

इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करावे|What to do to get into the field of interior designing

इंटिरियर डिझायनर माहिती मराठी मध्ये interior designer information in marathi 

आपल्याला एखाद्याच्या घरातली अंतर्गत सजावट म्हणजेच इंटिरिअर प्रचंड आवडतं आणि मग नकळतच त्या गृहसजावटीचं कौतुक होतं. त्याने किंवा तिने किती सुंदर इंटिरिअर करून घेतलं आहे, असे शब्द बाहेर पडतात. इंटिरिअरवर प्रचंड खर्च केला जात असला तरी घराला आकार देण्यामागे इंटिरिअर डिझायनरची मेहनत आणि आणि कल्पकता असते. मुळात इंटिरिअर डेकोरेशन आणि इंटिरिअर डिझायनिंग या दोन संज्ञांमध्ये खूप फरक आहे. इंटिरिअर डिझायनिंगचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं असून याचा संबंध डिझायनिंगशी आहे.

सध्याच्या काळात बँक, रुग्णालयं, हॉटेल्स तसंच कंपन्यांच्या पॅनेलवरही इंटिरिअर डिझायनर्सची नेमणूक केली जाते आणि प्रत्येक जण आपल्या मानकांनुसार फर्निचरचं डिझायनिंग करून घेतं. डिझायनिंगचं क्षेत्र अमर्याद आणि व्यापक आहे. फक्त घराच्याच नाही तर दुकानं, दालनं, मॉल्स, कार्यालयांच्या डिझायनिंगसाठी डिझायनर्सची आवश्यकता असते. काही कार्यालय, दालनं आणि मॉल्सच्या डिझायनिंगची मानकं ठरलेली असतात आणि त्यानुसार डिझायनिंग केलं जातं. काही वर्षांपूर्वीपर्यंत डिझायनिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी चित्रकला चांगली असणं महत्त्वाचं मानलं जात होतं. मात्र आज डिझायनिंगशी संबंधित अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध असल्यामुळे चित्रकलेमध्ये गती नसली तरी या क्षेत्रात कारकिर्द घडवणं शक्य झालं आहे.

इंटिरिअर डिझायनिंग म्हणजे काय | What is interior designing in Marathi

इंटिरिअर डिझायनिंग म्हणजे अंतर्गत सजावट. मुळात डिझायनिंग हे अत्यंत व्यापक असं क्षेत्र. इंटिरिअर डिझायनिंग ही या क्षेत्रातली एक शाखा. डिझायनिंग हे फक्त घर किंवा ऑफिसचंच असतं असं नाही तर अनेक गोष्टी डिझाईन केल्या जातात. उदाहरणार्थ सेट्स, औद्योगिक रचना तयार करण्यात डिझायनर्सचा सहभाग असतो. प्रा. प्रीती पटवारी यांनी डिझायनिंगच्या क्षेत्राची करून दिलेली ही ओळख,

इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करावे|What to do to get into the field of interior designing 

इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्राची निवड करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे हस्तकला, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये गती असणारी, कल्पक, निरिक्षणशक्ती उत्तम असणारी, व्हिज्युअलायझेशनची क्षमता असणारी मुलं डिझायनिंगकडे वळतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिझायनिंगच्या क्षेत्रातही विविध सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी निश्चितपणे मिळते. डिझायनर्सना भारतातच नाही तर परदेशातही अनेक संधी आहेत. इंटिरिअर डिझायनिंगची बाजारपेठ यापुढच्या काळात विस्तारत जाणार आहे. २०२५ पर्यंत या बाजारपेठेत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातल्या डिझायनिंग क्षेत्राच्या व्याप्तीबद्दल बोलायचं तर सीआयआयच्या आकडेवारीनुसार भारतात ३६,३८७ डिझायनर्स असून त्यापैकी १०.१७ टक्के इंटिरिअर डिझायनर्स आहेत. पुढील दशकभरात इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये दहा टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी डिझायनिंगच्या क्षेत्राकडे वळायला  हरकत नाही. दहावी किंवा बारावीनंतर किंवा पदवी मिळवल्यानंतरही डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तम करिअर घडवता येतं. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईन या संस्थेत नोंदणी करून तुम्ही कामाला सुरूवात करू शकता. सध्याच्या काळात कंपन्या इंटिरिअर डिझायनर्सची नियुक्ती करतात. अनेक कंपन्यांना दर तीन वर्षांनी कार्यालयाची रचना बदलावी लागते. याच कारणामुळे इंटिरिअर डिझायनर्सना कंपन्यांमध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते.


इंटिरियर डिझाइनिंग करण्यासाठी काय करावे How to become a interior designer in Marathi

दहावी झाल्यानंतर डिझायनिंगची आवड असणारे विद्यार्थी डिप्लोमा करू शकतात. दोन वर्षांचा डिप्लोमा केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यासाठी तीन किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटकडेही वळू शकतात. विविध प्रदर्शनं, सत्कार समारंभ तसंच अन्य कार्यक्रमांसाठी सेट डिझाइन करावा लागतो. डिझायनिंगचे विद्यार्थी या क्षेत्राची निवड करून पुढे जाऊ शकतात. चित्रपटांसाठी भव्यदिव्य सेट्सची उभारणी करावी लागते. हे कला दिग्दर्शकाचं काम असतं. डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात.

आधी म्हटल्याप्रमाणे डिझायनिंगच्या क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे ते फक्त घर किंवा ऑफिसच्या डिझायनिंगपुरतं मर्यादित नाही. डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही प्रोडक्ट डिझाईन करू शकता. उदाहरणार्थ दहा वर्षांपूर्वीच्या खुर्चीचं डिझाईन आज पहायला मिळत नाही. त्यात बदल होत असतात. हे बदल करण्यात प्रोडक्ट डिझायनर्सचा महत्त्वाचा वाटा असतो. शाळेसाठी लागणारं फर्निचर, घरासाठीचं फर्निचर, डायनिंगसाठीचं फर्निचरही डिझाईन केलं जातं. त्यामुळे या क्षेत्रातही संधी आहेत. बांधकाम क्षेत्रात फ्लोअर टाईल्सची आवश्यकता भासते. या टाईल्सचं डिझाइनही सतत बदलत असतं. त्यामुळे या क्षेत्रातही संधी आहेत. सध्याच्या काळात लोकांना वेगवेगळी डिझाईन्स हवी असतात. 

मग डिझायनर्स कल्पकतेचा वापर करून वैविध्यपूर्ण डिझाइन्स तयार करण्यात कंपन्यांना मदत करू शकतात. टप्परवेअर तसंच इतर अनेक उत्पादनांचं डिझायनिंग आकर्षक पद्धतीने करणं ही काळाची गरज बनून गेली आहे. म्हणूनच डिझायनर्सना प्रचंड वाव मिळू लागला आहे. डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर डिझायनिंगचं प्राथमिक शिक्षण दिलं जातं. त्यानंतर विद्यार्थी प्रोडक्ट डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन आदी शाखा मधून आपल्या आवडत्या शाखेची निवड करून त्यात उत्तम करिअर करू शकतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आज डिझायनिंगचे अनेकविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कमर्शियल डिझायनिंगचा एक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बॉटल डिझायनिंग, फोटोग्राफी, टेक्सटाईल डिझायनिंग, मेटल डिझायनिंग, स्कल्प्चर, पेंटिंग असे डिझायनिंगचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांकडे आहेत..

• how to become a interior designer

• how to become interior designer

• is interior designing a good career

• how to become interior designer in india

• interior designing course duration
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post