ऑनलाइन घरबसल्या Paytm KYC कशी करायची | Paytm KYC पूर्ण करण्याचे फायदे काय आहेत

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या लेख मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला सुध्दा घरबसल्या Paytm KYC करायची असेल तर, आजचे लेख तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे की ऑनलाइन घरबसल्या Paytm KYC कशी करायची. तसेच आज मी तुम्हाला पेटीएम केवायसी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहे जसे की पेटीएम केवायसी पूर्ण करण्याचे फायदे काय आहेत, पेटीएम केवायसी करण्याच्या पद्धती Methods of completing Paytm KYC. जर तुम्हाला सुद्धा वरील सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती जाणून घ्यायचे असेल तर आजचे लेख शेवट पर्यंत पूर्ण वाचा.

Paytm ॲप डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

आजच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक जण यूपीआय ॲप्स वर ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या ॲपचा वापर करत आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणताही व्यक्ती आपल्या खिशामध्ये पैसे न ठेवता मोबाईल ठेवून मोबाईल द्वारे इतरांना पैसे पाठवत आहे. दुकानातील कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर आपण डायरेक्ट दुकानात दिलेला QR कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असे वाटते की आपण सुद्धा पेटीएम, गुगल पे, फोन पे सारखे ॲप ॲप्सचे वापर करावे. यामधून कित्येक जण पेटीएम चा वापर करतात, परंतु पेटीएम चा वापर करणाऱ्या युजरला पेटीएम वॉलेटचा वापर करण्यासाठी केवायसी पूर्ण करायची असते परंतु त्यांना हे माहीत नसते की ऑनलाईन घरबसल्या पेटीएम केवायसी कम्प्लिट कशी करायची असते.

ऑनलाइन घरबसल्या Paytm KYC कशी करायची

ऑनलाइन घरबसल्या Paytm KYC कशी करायची How to Complete Paytm KYC at home 

जर तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन पेटीएम केवायसी पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ केवायसी हा पर्याय निवडावा लागेल. कारण या पर्यायाने आपण ऑनलाईन केवायसी करू शकतो. व्हिडिओ केवायसी करण्यासाठी तुम्हाला पेटीएम ॲप ओपन करायचे आहे, मग प्रोफाइल सेटिंग वर क्लिक करून अपग्रेट अकाउंट वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पेटीएम केवायसी करण्याच्या तीन पद्धती बघायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ केवायसी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व आधार कार्ड वरील नाव विचारले जाईल ते तुम्हाला समाविष्ट करायचे आहे. नंतर तुम्हाला प्रोसीड वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेल्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटिपी पाठवलं जाईल तो ओटीपी तुम्हाला तेथे प्रविष्ट करायचा आहे. कन्फर्म ओटीपी वर क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल. नंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल जसी की तुमचे पुर्ण नाव काय आहे, तुम्ही कसले काम करता, तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या आई वडिलांचे नाव काय आहे, नोमिनीस नेम पॅन कार्ड नंबर ही सर्व माहिती प्रविष्ट करायची आहे. ही सर्व माहिती समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वर क्लिक करून व्हिडीओ केवायसी साठी तयार राहायचे आहे व्हिडिओ केवायसी दरम्यान तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमची जन्मतारीख, तुमच्या वडिलांचे नाव व तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल. माया सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहे व केवायसी व्हिडिओ झाल्यानंतर दोन तासाच्या आत तुमची केवायसी वेरिफिकेशन संपूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल.

Paytm KYC करण्याच्या पद्धती Methods of completing Paytm KYC

1] Video KYC / व्हिडिओ केवायसी  

पेटीएम केवायसी पूर्ण करण्याच्या तीन पद्धती आहेत. त्यामधील पहिली पद्धत म्हणजे व्हिडिओ केवायसी आहे. व्हिडिओ KYC या नावावरूनच तुम्हाला कळले असेल की या पद्धतीमध्ये आपल्याला व्हिडिओ कॉल द्वारे केवायसी पूर्ण करायचे आहे, हो तुम्ही अगदी बरोबर समजले आहात. या पद्धती मध्ये Paytm KYC एजन्ट सबोत व्हिडिओ कॉल द्वारे KYC पूर्ण होते. व्हिडिओ केवायसी करतांना ज्या व्यक्ती च्या नावाने Paytm account आहे, त्याच व्यक्तीला व्हिडिओ KYC दरम्यान उपस्थित राहावे लागेल.

2] Nearby Paytm KYC Point / जवळील पेटीएम केवायसी पॉइंट 

पेटीएम केवायसी पूर्ण करण्याची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे पेटीएम केवायसी पॉईंट. या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या जवळील पेटीएम केवायसी पॉईंट मध्ये जावे लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या जवळील केवायसी पॉईंट मध्ये जाल तेव्हा तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड ची गरज लागेल. केवायसी पॉईंट मधील दुकानातील व्यक्ती तुमची केवायसी पूर्ण करेल. केवायसी पॉईंट मधील व्यक्ती त्याच्या मोबाईलच्या द्वारे केवायसी पूर्ण करेल.

3] KYC at your doorset / तुमच्या घरी येऊन केवायसी 

तिसरी पद्धत आहे ती म्हणजे KYC at your doorest या पद्धतीमध्ये पेटीएम केवायसी एजंट तुमच्या घरी येईल व तुमच्या घरी घेऊन केवायसी पूर्ण करेल. या पद्धतीसाठी तुम्हाला केवायसी एजंटला दीडशे रुपये द्यावे लागेल, कारण केवायसी करण्यासाठी त्या एजंटला तुमच्या घरापर्यंत यावे लागते व घरी येऊन केवायसी पूर्ण करावी लागते. ही पद्धत निवडण्यासाठी पेटीएम ॲप वरून या पद्धतीसाठी तुमच्या घराचा पत्ता पिनकोड संबंधित संपूर्ण माहिती समाविष्ट करावे लागते.

Paytm KYC पूर्ण करण्याचे फायदे काय आहेत Benefits of completing Paytm KYC 

तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की पेटीएम केवायसी पूर्ण करण्याचे फायदे काय आहेत Benefits of completing Paytm KYC. तर जेव्हा आपण आपली पेटीएम केवायसी पूर्ण करू तेव्हा आपण कोणत्याही दुकानातील QR कोडला स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट पेटीएम वॉलेट द्वारे करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण पेटीएम ची केवायसी नाही करू तेव्हा आपण गुगल पे, फोन पे किंव्हा अन्य UPI / Payment ॲप च्या युजरला QR कोड द्वारे Paytm wallet वरून पेमेंट करू शकत नाही. अर्थात पेटीएम वॉलेटचा वापर आपण इतर कोणत्याही पेमेंट ॲपच्या QR कोडला स्कॅन करून पेमेंट सेंड करू शकत नाही. पेटीएम केवायसी पूर्ण करण्याचा दुसरा एक फायदा आहे तो म्हणजे आपण पेटीएम वॉलेट मधील रकमेला स्वतःच्या बँक मध्ये ट्रान्सफर करू शकतो. तसेच आपण आपल्या मित्रांना हि पेटीएम वॉलेटचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकतो. तसेच पेटीएम केवायसी पूर्ण केल्यामुळे आपण पेटीएम सेविंग बँक खाते सुद्धा चालू करू शकतो. अजून आपण पेटीएम वॉलेट मध्ये एक लाखापर्यंत ची रक्कमेला मेंटेन ठेवू शकतो.

निष्कर्ष / Conclusion

आजच्या लेख मार्फत आपण जाणून घेतले आहे की ऑनलाइन घरबसल्या Paytm KYC कशी करायची | Paytm KYC पूर्ण करण्याचे फायदे काय आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आजचे आर्टिकल आवडले असेल, तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीणीना आजचे आर्टिकल शेअर करा. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखीन लेख सुद्धा नक्की वाचा.
Mr_Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post