दिवाळीत फक्त खर्च करू नका तर कमाई सुध्दा करा | जाणून घ्या दिवाळी मध्ये पैसे कमविण्याचे मार्ग

दिवाळी आली की प्रत्येकजण एक बजेट ठरवत असतो. म्हणजे काय तर, दिवाळीसाठी काय काय ट्रेंडी खरेदी करायचे, कुठे फिरायला जायचे, फराळाचा बेत कसा करायचा, नवा दागिना, नवी वस्तू कोणती आणायची, घराचे इंटिरिअर कसे बदलायचे या आणि अशा अनेक गोष्टी दिवाळीच्या यादीत असतात. आता ही यादी फक्त लिहून चालत नाही तर त्यासाठी आर्थिक बजेटही प्लॅन करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय नोकरदारांचा बोनस असो किंवा व्यावसायिकांचा नफा, दिवाळीच्या खर्चात हाती आलेला पैसा कधी संपतो ते कळतच नाही. 

दिवाळी मध्ये पैसे कमविण्याचे मार्ग

दिवाळी म्हणजे खिशाला थोडा जास्त भार हा अनुभव कुणीही नाकारणार नाही. पण हीच दिवाळी जर फक्त डेबिटचा कॉलम भरणारी न ठेवता क्रेडिटचा कॉलमही भक्कम करणारी असेल तर मग क्या बात है. दिवाळीच्या निमित्ताने जी काही उलाढाल बाजारपेठेत होत असते त्यामध्ये छोटय़ाशा पणतीपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत अनेक गोष्टींना मागणी वाढते. मागणी तसा पुरवठा हे तर आर्थिक गणितच आहे. म्हणूनच दिवाळीच्या सीझनमध्ये आपण खूप काही गोष्टींच्या माध्यमातून पैसे मिळवू शकतो. दिवाळी म्हणजे फक्त खर्च नव्हे तर दिवाळीत कमाईचे दीप लावण्याची संधी मिळू शकते. यासाठी आपल्याला थोडा स्वताबददलचा रिसर्च करावा लागेल. तो एकदा केला की मग दिवाळीत तुमच्यासाठी पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग खुले होतील. चला तर पाहूया दिवाळीच्या सीझनमध्ये तुम्ही कसे पैसे मिळवू शकता.

दिवाळी मध्ये पैसे कमविण्याचे मार्ग 

कलात्मक वस्तू बनवा आणि कमाई करा

अभ्यंगस्नानाच्या साहित्यविक्रीतून करा कमाई

सेवा दय़ा पैसे मिळवा

फराळ बनवा किंवा कुरिअर करा

रिसेलिंगमुळेही होईल कमाई

कलात्मक वस्तू बनवा आणि कमाई करा

दिवाळी मध्ये पैसे कसे कमवावे : गणपती विसर्जन झाले की खरंतर दिवाळीसाठी विक्रेत्यांची तयारी सुरू होत असते. त्यामुळे सुरूवातीला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की दिवाळीसाठी तुम्हाला ज्या वस्तूची विक्री करायची आहे त्याचे उत्पादन दिवाळीपूर्वी दोन महिने आधीपासूनच सुरू करायचे. जर तुम्ही बनवलेली वस्तू ग्राहकांना आवडली तर ती मोठय़ा प्रमाणात तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. अशा वस्तू बनवून तुम्ही दिवाळीत पैसे कमावू शकता. कलात्मक वस्तूंना दिवाळीत खूप मागणी असते. तुम्ही जर चांगले कलाकार असाल आणि तुमच्याकडे कल्पकता असेल तर तुमचा खिसा दिवाळीत नक्कीच भरेल. मातीच्या पणत्यांना रंगवून त्याचे सेट बनवून तुम्ही विक्री करू शकता. त्यासाठी तुमच्या शहरातील कुंभारांशी संपर्क साधून होलसेल मातीच्या पणत्या विकत घ्यायच्या आणि त्यावर पेंटिंग करून त्याची विक्री करू शकता. मातीच्या पणत्यांच्या किंमतीपेक्षा तिप्पट दराने या पणत्या विकल्या जातात ज्यामुळे तुमचा फायदा होतो.

आकाशकंदिलांमध्येही लोकांना वेगळेपण आवडत असते. कल्पकतेची आवड असलेल्या आणि वेगळेपणा शोधणारया ग्राहकांचे लक्ष तुम्ही बनवलेला आकाशकंदिल नक्कीच वेधून घेऊ शकतो. कागदी, कापडी आकाशकंदीलांची निर्मिती करून तुमची दिवाळीही कमाईने झळाळून उठेल. जर तुमच्याकडे विविध प्रकारचे तोरण बनवण्याचे कौशल्य असेल तरीही दिवाळीत तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी आहे. मणी, कापड, लटकन, आरसे, आर्टिफिशीयल फुले व पाने यांचा कलात्मक वापर करून तोरणांचे उत्पादन केल्यास दिवाळीचा सीझन तुमच्यासाठी पैसे मिळवून देणारा ठरेल. रांगोळी तर काढायची आहे पण ती कला जमत नाही त्यांच्यासाठी तर तुम्ही बनवलेली क्रिस्टल रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. प्लास्टिक काच किंवा प्लास्टिक फिल्म किंवा कॅनव्हास बेस वापरून त्यावर कुंदन, मोती लावून रेडीमेड रांगोळी हा सध्या ट्रेंड आहे. नोकरदार महिला हा तुमचा ग्राहक बनू शकतात. त्यामुळे अशा रेडिमेड रांगोळया किंवा मोत्यापासून महिरप बनवूनही दिवाळीच्या कल्पकतेतून तुम्ही आर्थिक कमाई करू शकता. दिवाळीत प्रत्येकजण आपले घर पारंपरिक वस्तुंनी सजवतो. त्यासाठी खणाचे कापड किंवा पैठणी काठाचा वापर करून बेडसीट, रनर, कुशनकव्हर, पडदे यांची निर्मिती केल्यास दिवाळीच्या काळात अशा वस्तूंना चांगला ग्राहक मिळतो ज्यामुळे कमाई होते.

अभ्यंगस्नानाच्या साहित्यविक्रीतून करा कमाई

Ways to make money in Diwali दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नानाला महत्व आहे. त्यामुळे घरोघरी उटण्याची खरेदी केली जाते. आयुर्वेदिक उत्पादनांही मागणी वाढत आहे. या गोष्टीजी सांगड घालून तुम्ही जर अभ्यंगस्नानाच्या साहित्याचे किट तयार केले तर त्यातून पैसे मिळवू शकता. उटणे कसे बनवायचे याची माहिती नसेल तर ती यूटय़ूबवरून पाहून मिळवू शकता. उटणे बनवताना विविध घटक एकत्र करायचे व त्याचे पॅकेट बनवायचे. यामध्ये दर्जेदार आयुर्वेदिक पावडरचा वापर तुम्ही केला तर दरवर्षी ग्राहक तुमच्याकडूनच उटणे विकत घेतील. तसेच होममेड साबण, अत्तर हे बनवण्याचा जर तुमचा छंद असेल तर अशा छंदाला तुम्ही व्यावसायिक रूप देऊ शकता. या वस्तूंना दिवाळीतच जास्त मागणी असते, शिवाय तुम्ही राहत असलेल्या परिसरात या वस्तू घरपोच दिल्यास ग्राहकांचीही सोय होते.

फराळ बनवा किंवा कुरिअर करा

दिवाली में पैसे कमाने के तरीके : दिवाळी म्हटलं की फराळ तर आलाच. लाडू, चिवडा, चकली, करंजी, बाकरवडी, शेव या फराळाशिवाय दिवाळी पूर्णच होत नाही. फराळाचे पदार्थ घरी बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. पण काही महिलांना घरी फराळ बनवणे शक्य नसते. त्यांच्यासाठी तुमचे पाककौशल्य मदतीला येते आणि हेच पाककौशल्य तुम्हाला दिवाळीत कमाई करणारे साधन ठरते. फराळाच्या पदार्थांच्या ऑर्डर्स घेऊन तुम्ही त्या पूर्ण करू शकता किंवा तयार फराळाचे पॅकेट स्टॉलवर विक्री करू शकता. फराळातून पैसे कमावण्याचा अजून एक सोपा मार्ग आहे ज्यामध्ये तुम्हाला फार कष्टही पडत नाहीत आणि पैसेही मिळतील तो म्हणजे पदार्थ बनवण्यासाठी पीठ तयार करणे, रेडीमेड सारण बनवणे. अनेक महिला असे साहित्य खरेदी करतात आणि फराळ घरी बनवतात त्यांच्यासाठी पूर्वतयारी सोपी करणारी इस्टंट पीठे, प्रीमिक्स तयार करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. हेही करायचे नसेल तर फराळाचे पॅकेटची कुरिअर सेवा देऊनही तुम्ही इन्कमसोर्स तयार करू शकता. आजकाल अनेक घरातील मुले परदेशात किंवा देशातील विविध राज्यात नोकरीव्यवसायानिमित्ताने आहेत. त्यांना घरच फराळ पाठवणारे दूत म्हणून तुम्ही सेवा देऊ शकता.

रिसेलिंगमुळेही होईल कमाई Reselling will also earn

शॉपिंग हा प्रत्येकाचाच आवडता प्रकार आहे. त्यात दिवाळीसाठी कपडे, ज्वेलरी, अॅक्सेसरीज, गृहोपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू यांची खास खरेदी केली जाते. ज्यांना मार्केटिंगची आवड आहे किंवा ज्यांच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य आहे त्यांना सेलिंग किंवा रिसेलिंग हा दिवाळीतील इन्कम देणारा मार्ग आहे. एकतर तुम्ही दिवाळीसाठी होलसेल कपडे, इमिटेशन दागिने, डेकोरेशन साहित्य आणू शकता आणि विक्री करू शकता. किंवा तुम्हाला इतकी गुंतवणूक करायची नसेल तर फक्त मार्जिन घेऊन रिसेलिंगही करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या सोशलमीडिया ग्रुपचा चांगला वापर करता येईल.

सेवा दय़ा पैसे मिळवा Get paid for the service

दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता हा एक टास्कच असतो. खरेदीचे प्लॅनिंग, फराळ बनवण्याची तयारी, नोकरी करत असलेल्या महिलांना असणारा सुटीचा प्रॉब्लेम यातून वेळ काढून घराची स्वच्छता करण्यासाठी कसा वेळ काढायचा असा प्रश्न पडलेल्यांसाठी तुम्ही सोल्युशन ठरला तर त्यातून कमाईची नामी संधी आहे. यामध्ये मात्र तुमचा ग्रुप असणे आवश्यक आहे. घराची, आजूबाजूच्या आवाराची स्वच्छता करून देणे, बाल्कनी डेकोरेट करून देणे अशा सेवा देऊनही दिवाळीच्या आधीच तुमचा खिसा कमाईने भरू शकतो.

तर मित्रांनो,दिवाळीत खर्च तर कराच पण दिवाळीत पैसे कसे कमावता येतील याचाही विचार करा. आज आपण दिवाळी मध्ये पैसे कमविण्याचे मार्ग, दिवाळी मध्ये पैसे कसे कमवावे या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे, जर तुम्हालाही दिवाळी मध्ये फक्त खर्च न करता पैसे कमवायचे असेल तर त्यासाठी आम्ही सुचवलेले मार्ग नक्की वापर व वरील मार्ग तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा..
Mr_Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post