Ticker

6/recent/ticker-posts

Groww ॲप काय आहे ( Groww App information in Marathi )

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या लेख मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही सुध्दा शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर आजचा हा लेख तुम्हा सर्वांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे कारण आज मी तुम्हाला एका अशा एप्लीकेशन बद्दल माहिती देणार आहेत ज्यामध्ये तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने शेअर विकत घेऊ शकता किंवा त्याला विकू शकतात तेही एकदम सोप्या पद्धतीने, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की त्या ॲपचे नाव काय आहे तर त्या मोबाईल ॲप्लिकेशन चे नाव Groww असे आहे. जर तुम्हाला सुद्धा या ॲपच्या मदतीने इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला Groww या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. Groww या ॲप्लिकेशनची माहिती आज आपण या आर्टिकल द्वारे जाणून घेणार आहोत तर चला मग पाहू Grow ॲप काय आहे Groww App information in Marathi

Groww App information in Marathi

Groww App information in Marathi 

आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती कडे काही पैसे आले तर तो बँकेत Fixed Deposit करणार नाही परंतु तो शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार, आता हे सर्वांनाच कळले आहे की शेअर मार्केट ही एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण छोट्या पैशाला सुद्धा मोठे करू शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता खूप सारे मोबाईल एप्लिकेशन्स उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकीच काही प्रसिद्ध असलेले ॲप म्हणजे Upstox किंव्हा Groww. काही लोकांना Groww एप्लीकेशन बद्दल थोडीफार माहिती असेल परंतु काहींना जे नवीन आलेले आहे त्यांना Groww बद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे. तर मग आज आपण Groww App information in Marathi हे पाहणार आहोत तुम्हाला सुद्धा ग्रो अॅप बद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर आजचे आर्टिकल तुमच्यासाठी खूप मदतदायी असेल म्हणूनच आर्टिकल शेवट पर्यंत नक्की वाचा. 

तुम्हाला हे सुध्दा वाचायला आवडेल :Groww App काय आहे Groww app information in Marathi 

तर Groww ॲप हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे एक प्रसिद्ध मोबाईल ॲप्लिकेशन आहे. Groww हे एक ऑनलाइन गुंतवणूक व्यासपीठ आहे जे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती देते. आपल्यापैकी काहींनी इंटरनेट मध्ये किंवा टीव्ही वरील जाहिरातीमध्ये ग्रो या बद्दल जाहिरात बघितली असेल. ग्रो या ॲपचा वापर करून आपण सोप्या पद्धतीने शेअर्स विकत घेऊ शकतो ह्या अॅपलिकेशन चा वापर कोणत्याही व्यक्ती एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. ग्रो या एकाच एप्लीकेशन मध्ये आपण शेअर मार्केट किंवा म्युचल फंड एसपीआय मध्ये गुंतवणूक करू शकतो. तेही एकदम कमी वेळे मध्ये. Groww ॲप च्या मदतीने आपण कोठेही कोणत्याही परस्थिती मध्ये कोणत्याही कंपनीचे मुचला फंड विकत घेऊ शकतो.

Groww ॲपची माहिती information of Groww app in Marathi

Groww ॲपचे मुख्यालय भारतातील बंगलोर व कर्नाटक मध्ये स्थित आहे. Groww ॲपचे मालक नेक्स्ट बिलियन technology आहे. Groww मधील प्रमुख ललित केशरे (सीईओ), हर्ष जैन, नीरज सिंग आणि इशान बन्सल आहे. Groww ॲप चे लाँच एप्रिल 2016 साली केले.

Groww ॲप मध्ये अकाउंट कसे बनवावे How to create account in Groww app in Marathi

1] Groww ॲप मध्ये अकाउंट तयार करण्यासाठी सर्व प्रथम ग्रोव्ह अॅप इंस्टॉल करावे लागेल.

2] Groww ॲप इन्स्टॉल करून साईन अप बटनवर क्लीक करायचे आहे. Gmail आयडी द्वारे sign up करणे.

3] नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे.

4] तुम्ही टाईप केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला वेरिफिकेशन साठी डायल करायचा आहे.

5] त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल, तुम्हाला पॅन कार्ड नंबर तिथे टाइप करायचे आहे.

6] तुम्हाला तुमचे जेंडर विचारले जाईल तुम्हाला gender निवडायचे आहे.

7] मग तुम्हाला marital status विचारले जाईल. मग तुम्हाला तुमचे व्यवसाय निवडायचे आहे.

8] त्यानंतर तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न विचारले जाईल तुम्हाला ते निवडायचे आहे.

9] त्यानंतर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे नाव विचारले जाईल नाव टाईप करून नेक्सट वर क्लिक करणे.

10] यानंतर तुमच्या बँक खात्या संबंधित माहिती विचारले जाईल. ज्या बँक खात्यामध्ये तुमच्या अकाउंट आहे ती बँक निवडणे.

11] नंतर तुमच्या बँक अकाऊंटची ब्रांच निवडणे. यानंतर बँक खात्याचे नंबर डायल करणे.

12] नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला Groww ॲप वर अकाउंट क्रिएट करायचे असेल तर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

13] आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तुम्हाला तो समावेश करायचा आहे.

14] यानंतर तुमचा लाइव्ह फोटो घेतला जाईल लाइव्ह फोटो घेतल्यानंतर तुमचे अकाऊंट तयार होईल.

Groww वर अकाउंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले बाबी Requirements for creating account on Groww


1] Aadhar card / आधार कार्ड 

जर ग्रो वर अकाऊंट तयार करायचे असेल तर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

2] Pan Card / पॅन कार्ड 

पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड वर कोणतीही नावाची त्रुटी नसणे.

3] Bank account / बँक अकाउंट 

ग्रो वर अकाउंट खोलण्यासाठी बँके अकाऊंटची आवश्यकता असते म्हणून कोणत्याही चांगल्या बँकेमध्ये बँक खाते असणे.

4] mobile number / मोबाईल नंबर

कोणतेही ऍप्लिकेशन मध्ये account करण्यासाठी मोबाईल नंबर आवश्‍यक असतेच तसेच Groww मध्ये सुद्धा अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर ची गरज असते.

Groww ॲप चे फायदे [Benefits of Groww App in Marathi]

1] Groww ॲप वापरण्यासाठी एकदम सोपे आहे यामध्ये कोणताही व्यक्ती सहज शेअर विकू शकतो किंवा खरेदी करू.

2] यामध्ये तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये अकाउंट ओपन करू शकता. 

3] गुंतवणूक करण्या संबंधित काही समस्या आल्यास आपण डायरेक्ट कस्टमर केअरला फोन करून समस्येचे निवारण विचारू शकतो. 

4] Groww ॲप चे कस्टमर केअर सपोर्ट अगदी जलद आहे. 

5] Groww मध्ये अकाउंट तयार करण्यासाठी अतिशय कमी कागदपत्रांचे वापर करावे लागते.

Post a Comment

0 Comments