बिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी How To Invest In Bitcoin | बिटकॉइन मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते का ?

२००७-०८ साली संपूर्ण जगाला आर्थिक मंदीने ग्रासले होते. यात भर म्हणून १५ सप्टेंबर २००८ ला अमेरिकेतील आर्थिक गुंतवणुक करणारा सर्वात मोठा आर्थिक समूह ‘लेहमन ब्रदर्स’ चे पतन झाले, आणि जगभरातील अनेक शेयर बाजार कोसळले. यानंतर संपूर्ण जगातील आर्थिक गुंतवणूक विश्वावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. यातूनच ३१ ऑक्टोबर २००८ रोजी 'सतोशी नामाकोटो' या व्यक्तीने इंटरनेट च्या मायाजालावर एक पेपर प्रसिद्ध केला. तो पेपर होता 'बिटकॉईन' नामक क्रिप्टोकरन्सी चा. आता तुम्हाला क्रिप्टोकरन्सी म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडला असेलच. तर क्रिप्टो करन्सी यातील क्रिप्टो हा शब्द लॅटिन आहे. क्रिप्टोग्राफी वरून क्रिप्टो हा शब्द घेण्यात आला आहे. क्रिप्टो याचा मराठी अर्थ होतो लपलेला. गुप्त-धन हि संज्ञा भारतात सर्वश्रुत आहे. तर मंडळी क्रिप्टोकरन्सी हा अशाच छुप्या अथवा गुप्त धनाचा एक प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक असे धन जे तुम्ही बघू शकत नाही परंतु त्याचे अस्तित्व नक्कीच असते. 

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 5 उत्तम ॲप्स

याहून सोप्या भाषेत सांगायचे झालेच तर आपल्याकडे प्रत्येक देशाचे असे एक चलन आहे. जसे भारतात रुपया, दुबईत दिराम, अमेरिकेत डॉलर, इंग्लड मध्ये युरो, सौदी अरेबिया मध्ये रियाल इत्यादी. तर हे चलन वापरून आपण जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतो. अर्थात ज्या गोष्टीला मोल आहे त्याला चलन असे म्हणतात. आणि प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे इतर देशांमध्ये त्या चलनाचे भाव कमी-जास्त प्रमाणात असतात. परंतु क्रिप्टोकरन्सी हे असे डिजिटल चलन आहे ज्यावर कोणत्याही देशाचा कंट्रोल नाही. क्रिप्टोकरन्सी फक्त डिजिटल स्वरूपातील cash system आहे. सुरवातीला हे चलन बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु नंतर त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक देशांनी ते कायदेशीर केले आहे. बिटकॉईन हे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले एक डिजिटल चलन आहे. चला तर मग आता जाणून घेऊ बिटकॉन करेन्सी म्हणजे काय ? 

बिटकॉईन हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक चलन आहे. बिटकॉईन हि एक अशी डिजिटल करन्सी आहे जी कोणत्याही अर्थ संस्थेच्या परवानगी व मदतीशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येते. भारतीय रुपयाला जसे RBI control करते तसे बिटकॉईन ला कोणीही control करू शकत नाही. त्याची जबाबदारीही कोणी घेत नाही. आजच्या वेळेपर्यंत संपूर्ण जगभरात २५०० हुन अधिक क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. ज्यावर शेअर बाजारासारखा लाखो करोडोंचा व्यापार चालतो. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी भारत स्वतःची क्रिप्टोकरन्सी लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

बिटकॉईनचे मालक कोण आहे ? 

९ जानेवारी २००९ मध्ये सतोशी नामाकोटो याने बिटकॉईन नेटवर्क सुरु केले. फिनी हा क्रिप्टोकरन्सी विषयी उत्सुक असल्याने सर्वात प्रथम व्यवहार फिनी आणि नामाकोटो यांच्यात झाला. त्यानंतर नामाकोटो ने ईमेल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून बिटकॉईन विषयी जगभरात खासगी व्यवहार करण्यास सुरवात केली. २०११ मध्ये नामाकोटो ने अचानक सर्व व्यवहार थांबवले. नामाकोटो ने बिटकॉईन ची धुरा गेविन अँड्रेसन या सॉफ्टवेअर डेव्हलपरकडे सोपविली. परंतु यापैकी कोणालाच नामकोटो कोण आहे हे माहित नव्हते. कारण सर्व व्यवहार ऑनलाईन होत होते. नामकोटो हे आजही एक रहस्य आहे. 
एलन मस्क यांच्या दाव्यानुसार प्रसिद्ध संगणक तज्ञ आणि क्रिप्टो ग्राफर निक सजाबो यांनी बिटकॉईनचा शोध लावला असावा. 

बिटकॉईन काम कसे करते How Bitcoin Works

जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते.

ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. प्रत्येक बिटकॉईन खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.

जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.

बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या दोन व्यक्तींमध्येच होतात. आणि त्यावर इतर कुणाचेही नियंत्रण नसते.

हे सगळे व्यवहार डिजिटल स्वरूपात केवळ त्या दोन अकाऊंट दरम्यानच होतात. या व्यवहारांमध्ये कुठलाही मध्यस्थ नसतो.

बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते का ?

बिटकॉईन सध्या सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन मध्ये गुंतवणुकीच्या संधीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुमचे नुकसान होणार नाही. सध्या बिटकॉईनसह सर्व क्रिप्टो अॅसेटमध्ये अस्थिरता जाणवत आहे परंतु बिटकॉईन मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घ मुदतीत अनेक पटीने परतावा मिळेल. 

बिटकॉईनचे फायदे काय आहेत Bitcoin benefits in Marathi

बिटकॉईनचे व्यवहार अतिशय कमी वेळात आणि संपूर्ण वर्षभर दिवसाचे २४ तास आपण करू शकतो. सरकारी सुट्ट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.

यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलेही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.

तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्यूटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.

एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या ॲड्रेस मार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात. या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो.

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 5 उत्तम ॲप्स

सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी व्यवहार अत्यंत तेजीत आहे. Zebpay, WazirX, CoinSwitch, इत्यादींसह अनेक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस भारतीय क्रिप्टो मार्केटमध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत. हे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज त्यांच्या वेबसाइट किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे व्यवहारासाठी विविध सुविधा प्रदान करतात. जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवीन असाल आणि विश्वासार्ह तसेच सुरक्षित क्रिप्टो एक्सचेंजमध्ये तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे तुम्हाला Bitcoin, Ethereum आणि इतर Altcoins मध्ये गुंतवणूक कशी करावी याची माहिती मिळेल.

1] CoinDCX 

हे भारतातील सर्वात मोठे आणि सुरक्षित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे जे 7 एप्रिल 2018 रोजी लाँच केले गेले आणि त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. सुमित गुप्ता सध्या CoinDCX चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. येथे तुम्ही तुमचे भारतीय चलन वापरून Bitcoin, Ethereum आणि इतर Altcoins खरेदी करू शकता. CoinDCX हे क्रिप्टो मालमत्तेवरील अनिश्चिततेमध्ये युनिकॉर्न स्थिती प्राप्त करणारे भारतातील पहिले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. त्यांनी $1.1 अब्ज मूल्याच्या सीरिज सी फंडिंग फेरीत $90 दशलक्ष जमा केले आहेत.

CoinDCX हे जगातील सर्वोत्तम क्रिप्टो एक्सचेंज आहे. हे प्लॅटफॉर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले आहे आणि काळजीपूर्वक तयार केले आहे. CoinDCX वरील व्यवहार अत्यंत विश्वासार्ह असतात त्याचप्रमाणे CoinDCX वापरण्यास अत्यंत सोपे आहे. 

2] WazirX 

हा भारतातील सर्वात विश्वासार्ह बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे ज्यामध्ये प्रगत ट्रेडिंग इंटरफेस सह क्रिप्टोकरन्सी खरेदी, विक्री आणि व्यापार करण्याची वैशिष्ट्ये आहेत. हे एक असे लाइव्ह ओपन ऑर्डर बुक सिस्टम असलेले एक्सचेंज आहे जे तुम्हाला बिटकॉइन, बिटकॉइन कॅश, लाइटकॉइन, डॅश आणि बरेच काही यासारख्या डिजिटल मालमत्तांचा व्यापार करू देते. 

WazirX आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीसाठी ट्रेडिंग करण्यासाठी समर्थन देते. निश्चल शेट्टी, समीर म्हात्रे आणि सिद्धार्थ मेनन यांचा समावेश असलेल्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हे एक्सचेंज चालवले जाते, ज्यांनी अनेक वेळा क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनच्या क्षमतेवर त्यांचा प्रगल्भ अभ्यास दर्शविलेला आहे. WazirX ट्रेडिंग प्लॅटफॉर्म USDT, BTC आणि INR (fiat) मध्ये व्यापार करण्यास सहाय्य करते. 

3] Unocoin 

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या उत्तम ॲप्स पैकी Unocoin हे एक ॲप आहे जे त्याच्या अत्यंत सोप्या इंटरफेस आणि अनेक क्रिप्टोकरन्सीला support करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ॲप साठी साइन अप करताना तुमचे अकाउंट तयार करा आणि तुम्हाला विचारण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करा. (KYC details) या ॲपमध्ये शेड्यूल करण्याची सुविधा आहे ज्याचा वापर करून तुम्ही प्रोफाइल टॅबवरून ऑटो-विक्री करू शकता. 

Unocoin वापरकर्त्यांना त्यांची मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर 0.7 टक्के शुल्क आकारले जाते, जे WazirX पेक्षा जास्त आहे. हा दर ६० दिवसांच्या किमान वापरासाठी लागू आहे. त्यानंतर, ॲप ०.५ टक्के शुल्क आकारेल आणि तुम्हाला गोल्ड मेंबरशिपमध्ये अपग्रेड करेल. Unocoin ठेवी किमान रु. 1,000 ला परवानगी देतात जी वझीरएक्स ऑफर केलेल्यापेक्षा जास्त आहे. परंतु जेव्हा तुम्ही NEFT, RTGS, IMPS किंवा UPI वापरून पैसे जमा करता तेव्हा वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. असे म्हणतात कि, MobiKwik वॉलेट वापरताना तुमच्याकडून 2 टक्के व्यवहार शुल्क आकारले जाते आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला बँकांनी निर्धारित केलेले शुल्क भरावे लागेल. Unocoin फिंगर आयडी आणि पासकोडद्वारे बायोमेट्रिक सुरक्षा सुविधा देखील प्रदान करते. परंतु समजा तुम्ही बायोमेट्रिक आयडीसोबत चुकीचा कोड टाईप केलात तर ॲप तुम्हाला लॉग आउट करेल. 

4]  Zebpay 

आणखी एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ॲप जे तुम्हाला कदाचित परिचित असेल ते म्हणजे Zebpay. हे मार्केटमधील सर्वात जुने क्रिप्टो ट्रेडिंग ॲप्स पैकी एक आहे. याद्वारे ट्रेडिंग सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरद्वारे साइनअप आणि संपूर्ण KYC तपशील देऊ शकता. तुम्ही Zebpay द्वारे क्रिप्टो ट्रेडिंगची कल्पना इतरांना समजावून सांगितल्यास म्हणजेच थोडक्यात त्यांना रेफर केल्यास जर त्यांनी साइन अप केले तर तुम्हाला एका वर्षासाठी तुमच्या लिंक्सद्वारे 50 टक्के ट्रेडिंग फी मिळेल. या ॲप मध्ये UPI द्वारे व्यवहारासाठी किमान ठेव रक्कम रु 100 आहे आणि इतर पेमेंट प्रकारांसाठी रु 1,000 आहे. 
Zebpay कडे सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी शुल्क आकारले जाते. त्यांची मेंबरशीप दरमहा 0.0001 BTC आहे. ॲप म्हणते की तुम्ही त्यात सक्रियपणे गुंतवणूक करून शुल्क टाळू शकता. Zebpay वर 0.15 टक्के maker फी आणि 0.25 टक्के taker फी देखील आहे. पण जर तुमचा व्यापार (खरेदी आणि विक्री) त्याच दिवशी झाला तर तुम्हाला फक्त 0.10 टक्के ट्रेडिंग शुल्क आकारले जाईल. Zebpay सर्व क्रिप्टोच्या विनामूल्य ठेवी ऑफर करते. परंतु तुम्ही UPI वापरून जमा केल्यास, 15 रुपये शुल्क आकारले जाते, तर नेटबँकिंगवर 1.77 टक्के शुल्क आकारले जाते. सर्व पैसे काढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर 10 रुपये शुल्क आकारले जाते आणि बिटकॉइन्ससाठी ते 0.0006 BTC आहे.

5] CoinSwitch Kuber 

कॉइनस्विच कुबेर हे अलीकडेच आयपीएल दरम्यान जाहिरातीतून सर्वश्रुत झाले. या प्लॅटफॉर्मला लोकप्रिय गुंतवणूकदार आणि Sequoia सारख्या VC कंपन्यांकडून निधी मिळाला आहे. याच्या वापराने तुम्हाला 100 पेक्षा जास्त क्रिप्टोमध्ये व्यापार आणि याकरिता बाजारातील सवोत्तम दर 
आकारण्यात येतो. या ॲपवर ट्रेडिंग करण्यासाठी नवीन खाते उघडताना तुमचा मोबाइल नंबर वापरा. परंतु तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी व्यापार सुरू करू शकत नाही. 

ॲपवर खाते सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला चार-अंकी पिन कोड चा पर्याय मिळेल. CoinSwitch Kube म्हणतात की, प्लॅटफॉर्मवरील पहिल्या 100,000 वापरकर्त्यांना 100 दिवसांसाठी ट्रेडिंग फी भरावी लागणार नाही. आक्रमक मार्केटिंग आणि साधा इंटरफेस यासाठी हे ॲप प्रसिद्ध आहे. हे ॲप NEFT, बँक हस्तांतरण आणि UPI द्वारे INR मध्ये ठेवी ऑफर करते. परंतु क्रिप्टो मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲप अयशस्वी ठरले. एकूणच या ॲपच्या सेवा यंत्रणेत सुधारणा आवश्यक आहे आणि व्यापाराचे तपशील उपलब्ध नाहीत.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post