ऑनलाईन Bajaj Finserv चे पर्सनल लोन कसे घ्यावे How to get a personal loan from Bajaj Finserv in Marathi

आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगांसाठी आपल्यापैकी बरेच जण काही ना काही रक्कम शिल्लक ठेवतात. सेविंग्स स्वरूपात, वा एखाद्या पॉलिसी स्वरूपात. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा आर्थिक फटका बसतो अथवा पैशांची गरज भासते त्यावेळी आपल्याकडे तरतूद असेलच असे नाही. म्हणतात ना पैशांचे सोंग घेता येत नाही. गेल्या ३ वर्षांपासून कोरोना या महामारीने आपल्या सगळ्यांनाच जेरीस आणले आहे. सर्व जगाला याचा फटका बसला आहे. साहजिकच आर्थिक चणचण प्रत्येकालाच भासू लागली आहे. अशावेळी जर आपल्या मदतीला कोणी धावून आले तर? आर्थिक विवंचनेत असताना अचानक कोणी पैशांची मदत देऊ केली तर? आजच्या आपल्या या लेखातून आपण अशाच एका तारणहार ठरलेल्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. 

आपल्यापैकी अनेकांना आठवड्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या बँकेतर्फे पर्सनल लोन घेण्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन येत असतात. पर्सनल लोन घेणे वाईट असते अशी आपल्यापैकी कित्येक जणांची धारणा आहे. परंतु Bajaj Finserv तर्फे पर्सनल लोन घेतल्यास तुम्ही विना अडचण तुमच्या आर्थिक परिस्थितीवर मात करू शकता. पर्सनल लोन हे एक असे अनसेक्युअर्ड लोन आहे ज्यामध्ये इच्छित निधी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सेक्युरिटी म्हणजेच कोलॅटरल गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे हे लोन तुम्ही तुमच्या कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी घेऊ शकता. इतर कोणत्या प्रकारचे कर्ज घेतल्यास तुम्हाला ते वैयक्तिक कारणांसाठी वापरता येत नाही. पर्सनल लोन चा योग्य वापर केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकते, जसे की कुटुंब/मित्रांसह सहलीचे नियोजन, घराची दुरुस्ती किंवा तुमच्या कुटुंब/लग्नासाठी आर्थिक मदत, उच्च शिक्षणासाठी लागणारा निधी, कुटुंबातील व्यक्तीच्या हॉस्पिटल साठी लागणारा खर्च इ. 

ऑनलाईन Bajaj Finserv चे पर्सनल लोन कसे घ्यावे

Bajaj Finserv ही अग्रगण्य NBFCs पैकी एक आहे जी 13.00% p.a पासून व्याजदरासह पर्सनल लोन देते. तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी Bajaj Finserv तुम्हाला त्वरित कर्ज मंजूरी आणि विनामूल्य कर्ज आगाऊ परतफेड यासारख्या सुविधा देखील प्रदान करते. Bajaj Finserv तर्फे कमीत कमी कागदपत्रे आणि झटपट लोन मंजुरीच्या साहाय्याने तुम्ही २५ लाखांपर्यंत पर्सनल लोन मिळवू शकता आणि तुमची स्वप्ने साकार करू शकता. याशिवाय काही निवडक बजाज फिनसर्व्ह ग्राहकांना Pre-approved पर्सनल लोन मिळू शकते. 

ऑनलाईन Bajaj Finserv चे पर्सनल लोन कसे घ्यावे How to get a personal loan from Bajaj Finance?


ऑनलाईन Bajaj Finserv चे पर्सनल लोन घेण्यासाठी सर्वप्रथम Bajaj Finserv च्या वेबसाईट वर क्लिक करा. https://www.bajajfinserv.in/ त्यानंतर वेबसाईट वर असलेल्या पर्सनल लोन या सेक्शनवर जा. 
तेथे तुम्हाला पर्सनल लोन करीता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या सूचना दिलेल्या असतील. तुम्ही Bajaj Finserv वेबसाईट वर दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन अर्ज भरू शकता. आता जाणून घेऊ वेबसाईट वर गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. 

१. दिलेला application form उघडण्यासाठी वेबसाईट वरील apply online या बटनावर क्लिक करा. 

२. तुमच्या बद्दलची माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक OTP येईल. हा OTP वेबसाईट वर दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये टाईप करून तुम्ही तुमची माहिती व्हेरिफाय करू शकता. 

३. तुमचे KYC डिटेल्स ( आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट इत्यादी.) आणि तुमचे उत्पन्न दिलेल्या फॉर्म मध्ये भरा. 

४. तुम्हाला हवी असलेली लोन ची किंमत निवडा. उदाहरणार्थ १ लाखाच्या लोन साठी १ लाख हा आकडा निवडा. 

५. तुमचे application सबमिट करा. 

यानंतर Bajaj Finserv चे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील आणि पुढील प्रक्रियेविषयी योग्य ती माहिती देतील. लोन साठी लागणारी सर्व पात्रता पूर्ण असल्यास २४ तासांच्या आत तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले असतील. 

Bajaj Finserv पर्सनल लोन व्याजदर आणि वैशिष्ट्ये Bajaj Finserv Personal Loan Rate of Interest and its Features.

 
Bajaj Finserv पर्सनल लोन साठी apply करणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांच्या पात्रतेनुसार लोन चे व्याजदर ठरविण्यात आले आहेत.  पर्सनल लोन चे प्रकार व्याज दर (प्रति वर्ष) लोन ची रक्कम परतफेडीची मुदत प्रोसेसिंग फी
पगारदार लोकांसाठी पर्सनल लोन १३ % पासून सुरु २५ लाखा पर्यंत १२ ते ६० महिने लोन amount च्या ४ %
फ्लेक्सी लोन (Personal Line of Credit) १३ % पासून सुरु २५ लाखा पर्यंत १२ ते ६० महिने लोन amount च्या ४ % डॉक्टर्स आणि CA साठी पर्सनल लोन १४ % ते १७ % ४२ लाखा पर्यंत १२ ते ९६ महिने लोन amount च्या २ %

बजाज फायनान्स पर्सनल लोनसाठी लागणारी पात्रता bajaj finance personal loan eligibility

राष्ट्रीयत्व - भारतीय

कामाची स्थिती - पगारदार

पगार - तुम्ही नोकरी करीत असलेल्या शहरावर आधारित कमीत कमी 22,000 किंवा त्यापेक्षा अधिक.

वय - 21 वर्षे ते 67 वर्षे

रोजगार - MNC, सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीत नोकरी. 

CIBIL स्कोअर - 750 किंवा त्यापेक्षा अधिक. 

बेंगलोर, दिल्ली, पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोईम्बतूर, गाझियाबाद, नोएडा, ठाणे या सारख्या शहरांतील अर्जदारांसाठी किमान रु. 35,000 प्रति महिना मासिक पगार असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद, कोलकाता येथील रहिवासी पर्सनल लोनसाठी अर्ज करत असतील तर त्यांचा मासिक पगार रु. 30,000 प्रति महिना असावा. जयपूर, चंदीगड, नागपूर, सुरत, कोचीन येथील अर्जदारांसाठी किमान रु. 28,000 प्रति महिना आवश्यकता. 

गोवा, लखनौ, बडोदा, इंदौर, भुवनेश्वर, विझाग, नाशिक, औरंगाबाद, मदुराई, म्हैसूर या ठिकाणचे रहिवासी व भोपाळ, जामनगर, कोल्हापूर, रायपूर, त्रिची, त्रिवेंद्रम, वापी, विजयवाडा, जोधपूर, कालिकत, राजकोट येथील अर्जदारांचे किमान मासिक उत्पन्न रु. 25,000 असले पाहिजे. 

बिदरसह इतर शहरांमधून पर्सनल लोनचा लाभ घेऊ पाहणारे तसेच मंड्या, भद्रक, बालंगीर, हसन, जुनागड, चाळीसगाव, गोध्रा, गांधीधाम, आणि पेण येथील रहिवाश्यांचे आवश्यक किमान मासिक वेतन रु. 22.000 प्रति महिना असे आहे. 

बजाज फायनान्स पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे bajaj finance personal loan documents

KYC कागदपत्रे

कर्मचारी ओळखपत्र

मागील 2 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप

मागील 3 महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट

Bajaj Finserv पर्सनल लोनकरीता पात्र होण्यासाठी वर नमूद केलेल्या शहरांनुसार तुमचे मासिक वेतन असेल व लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास कमीत कमी वेळात तुमचे पर्सनल लोन approve होऊ शकते. 

तुम्ही अर्ज भरता तेव्हा तुमची मूलभूत KYC कागदपत्रे आणि तुमची बँक स्टेटमेंट्स हाताशी ठेवा. तुमच्या दस्तऐवजाची पडताळणी केल्यावर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि तुम्हाला तुमचे वैयक्तिक कर्ज तुमच्या बँक खात्यात मंजूर झाल्यापासून २४ तासांच्या आत मिळू शकेल. Bajaj Finserv ने विविध अर्जदारांसाठी पर्सनल लोन योजना सुरु केली आहे. 

बजाज फायनान्स पर्सनल लोन व्याज bajaj finance personal loan interest rate in Marathi

व्याज दर: 13% p.a पासून सुरू. 

कर्जाची रक्कम: 25 लाखांपर्यंत. 

पेमेंट टर्म: 12 महिने ते 60 महिने. 

Pre-approved ग्राहकांसाठी विशेष ऑफर. 

कर्ज मंजूरीवर कोणतेही अंश-पूर्व-भुगतान शुल्क नाही आणि पात्रता अटी पूर्ण केल्याच्या 24 तासांच्या आत कर्जाची रक्कम हस्तांतरण. 

तर मित्रांनो, गरजेच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र असे म्हणतात. आम्ही दिलेल्या या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार Bajaj Finserv च्या वेबसाईट ला भेट द्या. अथवा खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करा आणि Bajaj Finserv ने सहजरित्या उपलब्ध करून दिलेल्या पर्सनल लोन च्या सुविधेचा लाभ घ्या.

Bajaj Finserv कस्टमर केअर

ग्राहक सेवा क्रमांक: 8698010101- शुल्क लागू. 

तुम्ही 8506889977 वर मिस्ड कॉल देऊ शकता अथवा याच क्रमांकावर तुम्ही Whatsapp द्वारे सहाय्यता घेऊ शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न

bajaj finance personal loan documents

bajaj finance personal loan eligibility

bajaj finance personal loan details

bajaj finance personal loan interest rate

Bajaj finance personal loan
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post