भाग्यापेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर तात्पर्य कथा | भाग्यपेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर कथा

भाग्यापेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर तात्पर्य कथा|भाग्यपेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर कथा 

ही गोष्ट होती एक कोष्ट्याची. राजदरबारातील भरजरी वस्त्र विणण्याचं, कला कौशल्याचं काम करत असूनसुद्धा त्या सोमिलक कोष्ट्याला फक्त पोटापुरतेचं मिळत होतं. आपल्याला जादा धन मिळावं, पोट भागावं अन् उद्यासाठी काही तरी उरावं, ही त्याच्या मनातली इच्छा खर तर सयुक्तिक होती; पण....

भाग्यापेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर तात्पर्य कथा|भाग्यपेक्षा अधिक कधीच मिळत नाही यावर कथा

एवढे राजदरबारचे कपडे विणूनसुद्धा, कला-कुसर येत असूनसुद्धा त्याला मिळणारा मोबदला हा इतर कोष्ट्यांपेक्षा फारच कमी होता. इतरांना सर्वसामान्य माणसांसाठी साध जाई-भरडं कापड विणूनही खूप पैसे मिळत होते. ह्याला मात्र केवळ पोटापुरतंच! त्यामुळेच दुःखी-कष्टी होऊन त्यान ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

एक दिवस तो आपल्या पत्नीला म्हणाला," प्रिये! इथं ह्या गावात माझ्या हातच्या कलेचं चीज होत नाही. त्याला म्हणावं, तसं मोल नाही. तेव्हा मी बाहेरगावी जातो, व्यवसाय करतो अन् जास्त धन कमवून आणतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, " धनी, तुम्ही म्हणता, ते योग्य आहे. तुमच्या कलेचं उचित मोल होत नाही, हे पण खरं; पण त्यासाठी तुम्ही गाव सोडावं, हे ठीक नव्हे. कारण मी असं वाचलंय, ऐकलंय, की माणसाला त्याच्या नशिबात जे अन् जेवढं असतं, तेवढंच त्याला मिळतं. धनाची इच्छा करणं, हे योग्य; पण त्याचा लोभ अन् अभिलाषा धरणं, हे दु:खाला कारणीभूत होतं. तेव्हा मला असं वाटतं की,

सोमिलक कोष्ट्याला बायकोचं ते मत काही पटलं नाही. त्याने आपला निर्णय पक्का केला अन् एक दिवस..
आपलं भाग्य पाहण्यासाठी तो कोष्टी घराबाहेर पडला.
कोण म्हणतं की, भाग्यापेक्षा जास्त मिळत नाही ? मी कष्ट करीन, काम, उद्योग श्रम-कष्ट करीन, धन कमवीन...असा निश्चय करत तो सोमिलक कोष्टी दुसऱ्या गावात आला तेथे दोन-तीन वर्षं राहून, भरपूर काम करून, आपली सर्व हस्तकला पणाला लावून

त्याने जवळ-जवळ तीनशे सुवर्णमुद्रा कनवटीला बांधल्या अन् ते धनाचं गाठोडं घेऊन मोठ्या आनंदानं तो आपल्या घराकडे परत निघाला. परतीच्या प्रवासात रात्र झाली, म्हणून तो एका झाडाखालीच थांबला. चालण्याच्या कष्टानं त्या झाडाखाली त्याला चटकन झोपही लागून गेली.

मध्यरात्रीनंतर त्याच्या कानांवर कसलीशी कुजबूज ऐकू आली. जागा होऊन त्याने पाहिल, तर त्याला त्याच झाडाखाली दोन माणसांच्या आकृत्या एकमेकांशी काही तरी दिसल्या. अंधारात नीट दिसत नसलं, तरी आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता... आपलं धनाचं गाठोड कवटाळत तो कोष्टी त्यांचं बोलण ऐकू लागला.

तेव्हा एक आकृता दुसऱ्या आकृतीला म्हणाली, "अरे कर्त्या ! ह्या सोमिलक कोष्ट्याच्या नशिबात केवळ अन्न-वस्त्राइतकंच धन आहे. तुला हे ठाऊक असूनही तू त्याला ह्या तीनशे सुवर्ण मोहरा कशा मिळवून दिल्यास ?"

त्यावर ती दुसरी आकृती म्हणजेच कर्ता म्हणाला, "जो मनुष्य जो उद्योग करेल, कष्टकरेल, मेहनत करेल, त्याला केल्या कामाचं फळ देणं, हे माझं काम आहे. मी ते केलं. आता मी जे त्याला दिल, ते त्याला पचू द्यायच का नाही, ते तू ठरव. ते काम तुझ म्हणजेच कर्माचं आहे. त्यात मला काही म्हणायचं नाही."

हे त्या दोन्ही आकृत्यांचं संभाषण सोमिलकने ऐकले अन् त्यानं आपल्या धनाच्या गाठोड्याला हात घातला, तो काय? साऱ्या सुवर्णमोहोरा गायब अन् गाठोडं रिकामं ! ते रिकामं गाठोडं आपल्या कर्मावर मारून घेत तो म्हणाला, "अरे, हे असं कसं

झालं? मी एवढे कष्ट केले, धन कमवलं, बरं ते मला मिळालं पण; पण...' जे आपल्या भाग्यात नाही, ते आपल्याला मिळत नाही हे बायकोचे शब्द त्याला आठवले. आता मोकळ्या हातांनी अन् कुठल्या तोंडानी घरी जायचं, असा विचार करून त्याने वाट बदलली. पुन्हा निदान पोटापुरतं तरी मिळवावं म्हणून तो त्याच गावात परत गेला.

तात्पर्य :- भाग्यापेक्षा अधिक कधीच मिळत नाही.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post