मुलांसाठी शाळेचे माध्यम कसे निवडावे How to choose a school medium for children in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचे आर्टिकल त्या पालकांसाठी खूप खास असणार ज्यांना आपल्या मुलांचे शाळेचे माध्यम कसे निवडावे असे प्रश्न पडले आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे मुलांसाठी शाळेचे माध्यम कसे निवडावे How to choose a school medium for children in Marathi.

मुलांसाठी शाळेचे माध्यम कसे निवडावे How to choose a school medium for children in Marathi

मुलांसाठी शाळेचे माध्यम कसे निवडावे How to choose a school medium

ज्या पालकांचा आर्थिक स्तर चांगला आहे, ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमात झालेले असले तरी ते उच्चशिक्षित आहेत, जे पालक आपल्या मुलांसाठी इंग्रजी भाषेतून संवादकौशल्य साधू शकतात, ज्यांच्या घरातील संस्कार, वातावरण हे इंग्रजी माध्यमातील शाळेशी जुळू शकते, त्या शाळेची शिस्त, नियम, कायदे पाळण्यास जड वाटणार नाहीत व जे मुलांच्या शिक्षणासाठी कलागुणांसाठी वेळ देऊ शकतात, अशा पालकांनी इंग्रजी माध्यमाची शाळा निवडण्यास प्राधान्य द्यावे. कारण आजच्या अति गतिमान संगणकयुगात इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. भविष्यात मुलाला पाश्चिमात्य देशात शिक्षण घ्यायचे असेल किंवा नोकरी करायची असेल ना तर इंग्रजी माध्यम निवडावे. पण वरील सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच माध्यम निवडावे व माध्यम निवडताना आई-वडील या दोघांनीही एकमेकांचा सल्ला घेऊन विचार करावा. कारण मुलाला. तुम्हाला घडवायचे असते. म्हणून तुमच्या मनाला बुद्धीला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्यावा मुलाची बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता, शाळेचे शिक्षण, आई वडिलांची साथ व मित्रांची संगत या सर्व गोष्टींवरच मुलाचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो.

शाळेचे माध्यम निवडताना घ्यावयाची काळजी :

ज्या आई-वडिलांचे शिक्षण हे मराठी माध्यम तून झालेले आहे, त्या आई-वडिलाना आपले मूल इंग्रजी माध्यमातून शिकवावे असे वाटते. परंतु सर्वच मुले इंग्रजी माध्यमातून यशस्वा हातालच असे नाही. मातृभाषेतून शिक्षण हे सहज, सोपे व रोजच्या बोलीभाषेतून असल्यामुळे मुलांना लवकर ज्ञान अवगत होते. त्यामुळे जर मुलाची बुद्धिमत्ता | सर्वसामान्य असेल, तसेच आई-वडिलांचे शिक्षण कमी असेल व मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी आर्थिक क्षमता कमी असेल, तर नक्कीच मातृभाषेतून शिक्षण घेणे योग्य असते. कारण घरातील वातावरण मुलांचे माध्यम निवडताना नक्कीच विचारात घ्यावे. जर आई-वडिलांना मुलाला इंग्रजी शिकवता येत नसेल, तर फक्त शिकवणीवर अवलंबून राहून इंग्रजी व माध्यम निवडू नये. कारण मुले ही शाळेपेक्षा घरी जास्त काळ राहतात. त्यांची संपूर्ण जडणघडण ही घरातील वातावरणावर अवलंबून असते. शाळेत प्रत्येक विषयाचे संपूर्ण आकलन होईल असे नसते. जर एखादा विषय मुलाला शाळेत समजला नाही, तर तो विषय आई-वडिलांना समजावून सांगता आला पाहिजे. नाहीतर मूल हुशार असूनदेखील विषय आकलन न झाल्यामुळे मागे राहू शकते व एकदा पाया कच्चा राहिला, की पुढील सर्व शिक्षणातील प्रगती खुटते. 

आज अनेक संशोधकांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, असे सांगितले आहे. कारण विषयाचे आकलन होणे हे मातृभाषेतून सहज साध्य होते; म्हणूनच रशिया, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतली गेली आहे. परंतु या देशांनी जगातील इतर भाषेतील ज्ञान आपल्या भाषेत सामावून घेतले आहे..

आज आपण समाजातील अनेक विद्वान व्यक्ती बघतो, की त्यांचे शिक्षण मातृभाषेतून झालेले असूनसुद्धा त्यांनी जीवनात विशिष्ट उंची गाठली आहे, की तीच उंची एखाद्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने गाठलेली नसते. सेमी इंग्रजी म. ध्यमातून इंग्रजी आणि मातृभाषा या दोन्ही भाषांचे ज्ञान अवगत होते. कारण मातृभाषेतून शिक्षण जरी सोपे असले, तरी इंग्रजी ही संपूर्ण जगाची, व्यवहाराची भाषा आहे, हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याच्या युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला हवे. व हे सर्व शिक्षण शासनामार्फत मोफत मिळते आहे.. सरकारी शाळांमधील सर्व शिक्षक देखील उच्चशिक्षित असतात. शिक्षकांना पगार, सुविधा या चांगल्या प्रतीच्या असल्याने ते मुलांना आनंदाने, समाधानाने शिकवतात. शासनाचा अंकुश या शाळांवर असतो. त्यामुळे सध्याच्या पालकांनी हा पर्याय निवडायला हरकत नाही.

शाळेत घालण्यापूर्वी मुलांची तयारी कशी करावी :

1]. मुलाला शाळेत घालण्यापूर्वी दोन-तीन महिने शाळेबद्दल चर्चा घरात करावी. शाळा कशी, छान असते, तेथे गेल्यावर मित्र भेटतात, खेळायला मिळते, खाऊ खायला मिळतो, मॅडम अभ्यास शिकवितात, याबद्दलची कल्पना मुलाला सहज बोलण्यातून द्यावी. 

2]. कामानिमित्त बाहेर कधी जाणे झाल्यास मुद्दामहून शाळेच्या इमारतीजवळ जावे जाता-येता मुलाला शाळेबद्दलची कल्पना द्यावी. "तुला व तुझ्या मित्रांना काही दिवसांनी येथे रोज यायचे आहे' असे सांगावे.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post