पर्सनल लोनचे वैशिष्टये गोल्ड लोनची वैशिष्टये Features of Personal Loan Gold Loan

पैशाची अचानक गरज भासल्यास बहुतांश मंडळी पर्सनल लोनचा आधार घेतात. पर्सनल लोनचा व्याजदर हा तुलनेने अधिक आहे. त्याचा व्याजदर पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. परंतु अशा काळात वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी गोल्ड लोन घेतले तर तो फायद्याचा व्यवहार ठरु शकतो. कारण त्याचे व्याजदर बऱ्याच प्रमाणात कमी आहे.

पर्सनल लोनचे वैशिष्टये गोल्ड लोनची वैशिष्टये Features of Personal Loan Gold Loan

कोरोना काळात दुसऱ्या लाटेने स्थिती को आणखीच बिघडली गेली आणि नवीन जॉब तर मिळाला नाही, उलट कपात केलेली सॅलरी देखील मिळाली नाही. या स्थितीत पर्सनल लोन घेतलेल्या नागरिकांना कर्ज फेडणे कठीण जावू लागले. त्याचवेळी व्याजही वाढू लागले. वैयक्तिक कर्जावरचा व्याजदर अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही वाढतच गेली. या स्थितीपासून वाचण्यासाठी गोल्ड लोन हा चांगला पर्याय ठरु शकला असतो. त्यात कमी व्याजावर कर्ज मिळाले असते. त्यामुळे आपण एखाद्या कामासाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर एकदा तरी गोल्ड लोनचा विचार करायला हरकत नाही.

पर्सनल लोनचे वैशिष्टये व गोल्ड लोनची वैशिष्टये Features of Personal Loan and Gold Loan 


पर्सनल लोनचे वैशिष्टये | Features of personal loan 

पर्सनल लोनचे सर्वात प्रका महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा जादा व्याजदर सर्वसाधारपणे पंधरा ते १८ टक्के दराने व्याजदरावर कर्ज वाटप केले जाते. व्याजदर अधिक असण्याबराबेरच हप्ता भरण्यास उशिर झाला तर संपूर्ण रक्कमेवर काही दंड आकारला जातो. त्यामुळे त्याची रक्कम ही वाढतच जाते. याशिवाय पर्सनल लोनमध्ये अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. काही वेळा बँका हमीचीही मागणी करतात. लिक्विड गॅरंटी रुपातून 18417 विमा पॉलिसी, घराचे कागदपत्रे याचीही मागणी क करु शकतात. एखाद्या ग्राहकाच्या आर्थिक स्थितीबाबत बँकांना संशय आला तर ते हमीबाबत आग्रही असतात. या कर्जासाठी कर्जदार आणि बँक यांच्यात करार होतो. त्यात. किमान ३० ते ३५ ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या जातात. एकूणात पर्सनल लोनमध्ये खूपच औपचारिकता पार पाडावी लागते. खासगी क्षेत्रात तर काही कंपन्या काही मिनिटातच कर्ज देऊ असे सांगतात. अशा कंपन्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे. आरबीआयने देखील मोबाईलवरुन कर्ज देणाऱ्या कंपन्यांपासून सजग
राहण्याची सूचना केली आहे.

गोल्ड लोनची वैशिष्टये | Features of Gold Loan

गोल्ड लोन योजना ही बँकांकडून सोने तारण ठेवून कर्ज देण्याची सुविधा प्रदान केली जाते. बँकेशिवाय सोन्याशी निगडीत असलेल्या अन्य कंपन्या देखील सोने तारण कर्ज देतात.

बँकांत गोल्ड लोनरुन फारशी औपचारिकता पार पाडली जात नाही. जर बँकेत खाते असेल तर आपल्याला केवळ सोने घेवून बँकेत जावे लागेल. सोन्याची शुद्धता तपासल्यानंतर बँक आपले कर्ज मंजूर करेल.

गोल्ड लोनचे व्याजदर फारसे नसते. पर्सनल लोनचे व्याजदर हे पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक राहते. तर गोल्ड लोनवर सध्या किमान सात टक्के तर कमाल ११ ते १२ टक्के दराने कर्ज मिळत आहे.

बँक सर्वसाधारपणे सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्के रक्कम कर्ज रुपातून देते. तर सोन्याशी निगडीत असलेल्या कंपन्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. गोल्ड लोन घेण्यापूर्वी प्रिपेमेंट चार्ज,.. प्रोसेसिंग फीस आदी शुल्काची माहिती घेणे गरजेचे आहे. कारण कर्ज मंजूर करताना बँकांकडून केली जाणारी शुल्क वसूली ही पर्सनल लोनच्या व्याजदराला अॅडजेस्ट करणारी... तर नाही ना, याची पडताळणी करायला हवी..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post