जशास तसे यावर बोधकथा | जशास तसे तात्पर्य कथा

जशास तसे यावर बोधकथा | जशास तसे तात्पर्य कथा

पूर्वी एका गावात एक जीर्णधन नावाचा व्यापारी राहात होता. त्याच्या व्यावसायिक अचूक निर्णय अन् कौशल्यामुळे त्याला चांगलं धन मिळत होतं. पण ... निसर्गातल्या उन्हाळ्या-पावसाळ्याप्रमाणेच जीवनातही स्थित्यंतरं येतात.

जशास तसे यावर बोधकथा | जशास तसे तात्पर्य कथा

त्याप्रमाणेच त्याला एका व्यवहारात मोठी खोट बसली. अन्... कालचा धनिक जीर्णधन हा कंगाल झाला. ज्या गावांत श्रीमंतीत दिवस काढले, तेथेच आता कंगाल होऊन राहणं त्यांच्या मनाला पटेना. आता त्याने बाहेरगावी जाण्याचा विचार केला. आपल्या वाड-वडिलांची ठेव, जो एक मोठा लोखंडी तराजू होता, त्याने तो तराजू एका व्यापाराकडे ठेव म्हणून ठेवला. सर्वांचा निरोप घेऊन तो व्यापारासाठी परदेशी गेला. त्या प्रांतात जाऊन त्याने कौशल्याने छान व्यापार केला अन् धन कमवून तो
आपल्या गावी परत आला. त्या व्यापारांकडे जाऊन त्याने आपला तराजू परत मागितला. त्या वेळी तो लबाड व्यापारी जीर्णधनला म्हणाला, "मित्रा, अरे, तू तुझा तराजू माझ्याकडे दिला होतास ते खरं रे; पण इतके दिवसांत मात्र उंदरांनी तो तराजू खाऊन टाकलाय रे !"

" काय ? उंदरांनी तराजू खाल्ला ?"
हो. अरे, खरोखरच खाल्ला. त्याला आता किती दिवस झाले ?"
जीर्णधनाच्या काही गोष्टी लक्षात आल्या; पण त्यानं तसं दाखवलं नाही.

" बरं असो. आता मला नदीवर जाऊन आंघोळ-पूजा करून येऊ दे. पूजा-साहित्य नेण्यासाठी तुझ्या मुलाला जरा बरोबर दे." 

चला, तराजूची चोरी तर पचली ह्या आनंदात त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला जीर्णधनबरोबर पाठवले.
स्नान पूजा करून जीर्णधनने त्या व्यापायाच्या मुलाला एका गुहेत लपवून ठेवले अन् तो एकटाच परत आला. जीर्णधनला एकटाच आलेला पाहून त्या व्यापाऱ्याने विचारले, "मित्रा ! तुझ्याबरोबर आलेला माझा मुलगा कुठाय?"

तुझा मुलगा...तुझा मुलगा..."
" काय झालं माझ्या मुलाला ?"
अरे, मी आंघोळ करायला नदीच्या पात्रात उतरलो आणि... एका मोठ्या गिधाडाने तुझ्या मुलाला पळवून नेले."
" काय ? गिधाडाने अन् माझ्या मुलाला पळवून नेले? हे शक्य आहे ** होय मित्रा ? "मी नदीतून धावत आलो; पण त्या आधीच..." त्या लबाड व्यापाऱ्याच्या लक्षात काही तरी येऊ लागले. आता त्यानं मोठा कांगावा चालू केला अन् दात-ओठ खात त्यानं सरळ राजदरबारात धाव घेतली.

राजासमोर त्या गोष्टीचा न्यायनिवाडा चालू झाला.
जीर्णधनला विचारण्यात आले, "काय रे, तू ह्याच्या मुलाला घेऊन गेला होतास का ?"

होय महाराज..." उत्तर आलं.
कुठं नेलं होतंस तू त्याला सांग ! 
महाराज, मी त्याला माझ्या बरोबर नदीवर घेऊन गेलो होतो. मी आंघोळ करायला नदीवर उतरलो आणि ..."

आणि काय झालं... खरं खरं सांग ."
'महाराज ! आकाशातून एक गिधाड आलं अन् त्या मुलाला उचलून घेऊन गेलं."
" काय ? मुलाला गिधाड कसं नेईल ?'

तेव्हा त्या लबाड व्यापाराकडे पाहात जीर्णधन म्हणाला, “महाराज, जर लोखंडाचा (उंदीर खाऊ शकतो, तर गिधाड मुलाला का नेऊ शकणार नाही ?" तराजू "हे बघ. सारं काही नीट सांग. हे तराजू उंदीर गिधाड हे काय आहे ?" जीर्णधनने सर्व हकीगत सांगताच सारा प्रकार राजाच्या लक्षात आला. राजाने आधी चोरलेला तराजू अन् मग लपवलेला मुलगा परत देण्याची आज्ञा केली. सर्व लोक हेच
म्हणाले, बरं झालं. जगात असंच वागलं पाहिजे.

तात्पर्य :- ह्या जगात चांगल्यांशी चांगलं अन् दुष्टाशी जशास तसे वागावे. तरच निभाव लागतो.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post