परोपकारी मुंगूसावर तात्पर्य कथा | परोपकारी मुंगूसाची गोष्ट | Meaning story on altruistic Mongoose in Marathi

परोपकारी मुंगूसावर तात्पर्य कथा परोपकारी मुंगूसाची गोष्ट Meaning story on altruistic Mongoose in Marathi


एका छोट्याशा गावात एक देवदत्त नावाचा ब्राह्मण राहात होता. त्याची पत्नी ही सुशील अन् गृहदक्ष होता. त्या दोघांची भगवंतावर मोठी श्रद्धा होती. "देवानं आपल्याला जसं ठेवलंय, त्या परिस्थितीत दोघं आनंदानं दिवस काढत होते.

परोपकारी मुंगूसावर तात्पर्य कथा परोपकारी मुंगूसाची गोष्ट Meaning story on altruistic Mongoose in Marathi

एके दिवशी देवदत्तच्या पत्नीनं एका सुंदर अशा मुलाला जन्म दिला. नेमकं त्याच वेळी त्याच्या घरांत एक मुंगूस व्यालं. मात्र, त्या जन्मलेल्या मुंगसाची आई मात्र मेली.. मात्र त्या ब्राह्मणाच्या बायकोनं आपल्या मुलासारखंच ते मुंगूसही पाळून-पोसून लहानाचं मोठं केलं. तो मुंगूसही एखाद्या भावंडासारखं त्या मुलाशी खेळू लागला.. मुंगसालाही त्या बाळाबरोबर खेळायला फार आवडे. एके दिवशी पाणी

आणायला म्हणून ती घागर घेऊन बाहेर निघाली. तिनं आपलं झोपलेलं बाळ दुपट्यावर ठेवलं होत अन् मुंगूसपण जवळच छान झोपलं होतं. त्या दोघांकडे तिनं नवऱ्याला नीट लक्ष ठेवायला सांगितल अन् ती पाणी आणायला नदीवर गेली. दोघंपण शांत झोपली आहेत, हे पाहून दार पुढं करून तो ब्राह्मणही भिक्षा आणण्यासाठी गावात गेला...

थोड्या वेळातच एक साप फुसफुस करीत घरात शिरला. त्या सापाचा तो आवाज अन् वास यानं मुंगसाला एकदम जाग आली. त्यानं समोर पहिलं, तर ते काळं जनावर दुपट्यावरच्या बाळाकडे सरपटत पुढे सरकताना पाहिलं; अन्.. त्यानं एकदम पवित्रा घेतला. त्यानं सापावर आक्रमक चढाई केली...

साप आणि मुंगूस ह्यांचं तर जन्मजात हाडवैर! मग काय ! त्यांच्यात खूपच जुंपली. पण मुंगसानं आपल्या भावाचं (त्या बाळाचं) रक्षण करीत त्या सापाची चांगली खांडोळी केली. त्याचे तुकडे तुकडे केले... साप मारला गेला अन् रक्तमाखल्या तोंडानं मुंगूस आपला तो पराक्रम सांगायला दारात जाऊन बसलं.

ब्राह्मणाची बायको दारात येऊन पाहते, तो काय ? तोंडाला रक्त माखलेलं मुंगूस दारात. त्याला पाहताच त्या ब्राह्मणाच्या बायकोला असं वाटलं, की ह्यानंच आपल्या बाळाला मारलं असल पाहिजे.... आणि त्या कल्पनेनंच तिला त्या मुंगसाचा राग आला. तिनं मागचा पुढचा विचार
न करता ती भरलेली घागर त्या मुंगसाच्या डोक्यावर मारली. त्या आवाजानं मात्र आत शांत झोपलेलं बाळ जागं झालं अन् रडू लागलं. बाळाचा

आवाज ऐकून ती लगेच घरात जाऊन पाहते, तो काय !
बाळ सुरक्षित होता. दुपट्यावर रडत होता. आईला पाहताच तो हसू लागला. मात्र.. जवळच सापाचे तुकडे पडलेले तिनं पाहिलं अन् मग तिच्या लक्षात आलं की, त्या मुंगसाच्या तोंडाला जे रक्त लागलं होतं, ते बाळाचं नव्हे; तर सापाचं होतं. मुंगसानं सापाला मारून बाळाला वाचवलं होतं; पण बाळाच्या आईनं मात्र मुंगसाचा बळी घेतला होता. ते कळताच ती त्या मुंगसासाठी रडू लागली.

तात्पर्य :- कोणताही निर्णय अन् निकष हा अविचारीपणे घेऊ नये.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post