BGMI lag Fix कसे करावे How to fix lag in BGMI [ in Marathi ]

लहानांपासून तर मोठ्यांनाही आवडणारा असा हा पब्जी गेम. पब्जी हा बॅटलग्राऊंड असणारा मोबाईल गेला आहे जे सर्वच मुलं किंवा सर्व युवक आवडीने खेळत असतात. चिनी ॲप बंदीच्या कारणास्तव व भारतीय नागरिकांच्या डाटाचे सुरक्षिता साठी पबजी मोबाईल हा गेम सुद्धा भारत सरकारने बंद केला आहे. पब्जी गेमची बंदी भारतीय युवकांना खूप उदास करणारी होती. परंतु या समस्यावर निवारण करण्यासाठी क्राफ्टोन या कंपनीने पब्जी सारखाच एक बॅटल ग्राउंड मोबाईल गेम तयार केला आहे त्याचे नाव BGMI ( Battleground Mobile India ) असे आहे. या गेमची ग्राफिक व सिमिलीरिटी पब्जी गेम सारखीच आहे. म्हणजेच हा गेम पूर्ण पब्जी सारखाच आहे, परंतु हा गेम फक्त भारतीय प्ल्येअर साठीच लॉन्च करण्यात आलेला आहे. म्हणजेच भारतीय प्लेअर साठी स्वतंत्र असलेला असा हा गेम आहे. बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया BGMI नुकताच लॉन्च झालेला आहे. या गेम चे नाव बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असे आहे. 

BGMI lag Fix कसे करावे How to fix lag in BGMI ( Battleground Mobile India )

ज्यांना-ज्यांना बॅटल ग्राऊंड मोबाईल इंडिया गेम खेळायचा होता अशा सर्व युवकांनी हा गेम डाऊनलोड केलेला आहे. परंतु काही युजर्सला एका समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे BGMI lag. म्हणजेच गेम खेळत असताना त्यांना LAG समस्येला सामोरे जावे लागतो. मॅच खेळत असताना गेम एकदम रंगीत मुडवड आलेला असतो, व गेम मध्ये कमी खेळाडू राहीलेले असतात, आपण विजयी होण्याची भावना मनामध्ये आले असते तर त्यातच गेम जर लेग होत असल तर पूर्ण गेम खेळण्याचा मोह निघून जात असतो. या मुळे आपण खूप दुखी होईन जातो, जर गेम लेग झालं तर आपल्याला गेम मधून एक्झिट होवे लागते. या सर्वामुळे आपला पूर्ण मोड निघून जातो, व आपण खूप रागलो जातो. या समस्येला दूर करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी हा लेख प्रदर्शित करत आहे. आजच्या लेखा मार्फत मी तुम्हा सर्वाना सांगणार आहे की BGMI lag fix कसे करावे How to fix lag in BGMI. तर चला मग पाहूया की BGMI lag fix कसे करावे

गेम लेग होणे म्हणजे काय BGMI game lag meaning in marathi 

गेम लेग होण्याच्या समस्यावर निवारण कसे करावे हे जाणून घेण्याच्या पहिले आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायला हवे कि गेम लेग होणे म्हणजे काय. तर जेव्हा खेळाडू गेम मध्ये क्रिया करतो आणि जेव्हा गेम सर्वरच्या क्रियांमध्ये विलंब होत असतो तेव्हाच्या स्थितीला गेम लेग होणे असे म्हटले जाते. जेव्हा गेम लेग होत असतो तेव्हा गेम मधील खेळाडू क्रिया करतो परंतु समोरील खेळाडूला ती क्रिया होत असताना दिसत नाही व आपण क्रिया करतो परंतु ती क्रिया होतच नसते. तसेच गेम खेळता खेळता गेम मधीच स्टॉप किंव्हा थांबला जातो यास गेम लेग होणे असे म्हंटले जाते. तुम्हाला गेम लेग होण्याचा अर्थ नक्कीच समजलं असेल. आता आपण How to fix lag in BGMI हे जाणून घेऊया.

BGMI गेम लेग होण्याचे कारण The reason for the BGMI game leg

1] Net speed कमी असणे

2] बॅकग्राऊंड डाटा ऑन असणे

3] कमी रॅम असलेले फोन्स

4] प्रोसेसर शक्तिशाली नसणे

5] फोन मधील स्पेस कमी असणे

6] मोबाईलचा प्रोसेसर गरम होणे

1] Net speed कमी असणे :

गेम लेग होण्याचा सर्वात मोठे कारण असते ते म्हणजे इंटरनेट स्पीड कमी असणे. इंटरनेट स्पीड कमी असल्या कारणामुळे गेम लेग होत असतो म्हणून आपण प्रयत्न करावा कि गेम खेळते वेळी इंटरनेटचे स्पीड फास्ट असावी. इंटरनेट स्पीड कमी असल्यामुळे गेम ला जेवढा नेट लागतो तेवढा पुरेसा होत नाही त्यामुळे गेम लेग होत असतो. म्हणून अशावेळी ज्या ठिकाणी इंटरनेट स्पीड जास्त असेल त्या ठिकाणी गेम खेळावे किंवा जर तुमच्या घरा मध्ये वायफाय असेल तर वाय फाय कनेक्ट करून गेम खेळू शकता असे केल्यामुळे गेम लेग होणार नाही.

2] बॅकग्राऊंड डाटा ऑन असणे :

गेम खेळते वेळी बॅकग्राऊंड मध्ये कोणतेही ॲप्स रन करत असेल तर तेव्हा सुद्धा तुमचा गेम लेग मारू शकतो. म्हणून BGMI गेम खेळत्या वेळी बॅकग्राउंड मधील सगळे ॲप्स क्लोज करावे. असे केल्याने गेम लेग होणार नाही. बॅकग्राऊंड डाटा ऑफ करण्यासाठी सर्व कंपनीच्या फोन मध्ये एक ऑप्शन असते जिथून आपण ॲपचे बॅकग्राऊंड डाटा ऑफ करू शकता. म्हणून गेम खेळते वेळी बॅकग्राऊंड डाटा ऑफ करावे.

3] कमी रॅम असलेले फोन्स :

काही युजरचे मोबाईल 2 जीबी रॅम व 3 जीबी रॅम वाले असतात. 2 जीबी रॅम 1 जीबी राम व 3 जीबी रेम यांचे मोबाईल BGMI सारख्या मोठ्या गेम साठी पात्र नसतात म्हणजे लहान जीबी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये तेवढी स्पेस नसते की तेवढे मोठे गेम्स त्यामध्ये रण करू शकतात तेही चांगल्या प्रकारे. म्हणून मोठी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये BGMI सारखे मोठे गेम खेळावे. बीग रॅम असलेल्या मोबाईल मध्ये तुम्ही एचडी क्वालिटी मध्ये व त्यापेक्षा चांगला ग्राफिक मध्येही गेम खेळू शकता तेही विदाऊट लेग.

4] प्रोसेसर शक्तिशाली नसणे :

काही फोनचे प्रोसेसर कमी शक्तिशाली असतात जेणेकरून ते गेम खेळण्यासाठी चांगले नसतात. म्हणून तुम्ही अशा मोबाईलचा वापर करा ज्यांचा प्रोसेसर हाय क्वालिटी व शक्तिशाली असेल जेणेकरून त्यामध्ये तुम्ही गेम खेळू शकता तेही बिना लेग होता. 

5] फोन मधील स्पेस कमी असणे :

जर फोन मध्ये फाईल किंवा डॉक्युमेंट अधिक असल्यामुळे फोनची इंटरनल स्टोरेज फुल होऊन जाते व या कारणामुळे गेम लेग होत असते म्हणून मोबाईल मधील न वापर होणारे ॲप्स गेम्स फाइल डिलिट करा यामुळे गेम खेळताना लेग होणार नाही. जर मोबाईल मध्ये स्पेस जास्त असेल तर तेवढा गेम लेग होणार नाही. यावरून असे कळते की जेवढी जास्त स्पेस असेल तेवढी जास्त तुम्ही गेमचा आनंद लुटू शकता. 

6] मोबाईलचा प्रोसेसर गरम होणे :

गेम खेळते वेळी जेव्हा मोबाईलचा प्रोसेसर गरम होतो तेव्हा गेम अधिक लेग मारणे सुरु होत असतो. उन्हाळ्यामध्ये किंवा जर तुम्ही गरम ठिकाणी गेम खेळत असाल तर तेव्हा मोबाइल अधिक गरम होत असतो. मोबाईलचा प्रोसेसर गरमीमुळे गरम होत असतो. आणि मोबाईल गरम झाल्यामुळे गेम सुद्धा अधिक लेग मारत असतो. म्हणून गेम खेळत असताना कुलर किंवा फॅन चालू असावे जेणेकरून मोबाईल गरम होणार नाही.

7] बॅटरी चार्ज कमी असणे :

गेम खेळते वेळी मोबाइल ची चार्जिंग कमीत कमी 80, 90 टक्के असणे चांगले असते कारण जेव्हा मोबाईलची बॅटरी कमी चार्ज असते तेव्हा गेम अधिक लेग होत असते. म्हणून BGMI खेळत असताना मोबाईलची बॅटरी अधिक चार्ज राहू द्या. 

BGMI lag fix कसे करावे How to fix lag in BGMI 


1] GFX Tool :

गुगल प्ले स्टोअर वर GFX Tool नावाचे ॲप्स असतात, ज्याचा वापर तुम्ही गेम अधिक स्मूथ चालवण्यासाठी करू शकता.GFX tool च्या मदतीने तुम्ही गेमची ग्राफिक एचडी किंवा एचडी आर व स्मूद करून खेळू शकता. काही gfx टूल फ्री असतात तर काही प्रिमियम असतात तुम्ही कोणतेही युज करून गेम खेळू शकता.

2] Flash Dog GFX tool :

Flash Dog GFX tool हे एका ॲपचे नाव आहे जे जमीन साठी एकदम उपयुक्त असते या ॲपच्या मदतीने तुम्ही गेम अधिक स्मूथ व चांगला रंन करण्यासाठी करू शकता. या ॲपच्या मदतीने गेम खेळते वेळी सीपीयू अपग्रेड होतो बॅटरी अपग्रेड होते व GPU सुध्दा अपग्रेड होते. हे सर्व अपग्रेड झाल्यामुळे गेम अधिक चांगल्या प्रकारे खेळता येऊ शकतो. या ॲपचे वापर केल्यामुळे BGMI lag fix होऊ शकते.

3] थंड ठिकाणी गेम खेळणे :

जेव्हा तुमचा गेम लेग मारत असेल तेव्हा तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी व फॅन समोर येऊन गेम खेळा, कारण गेम थंड हवेच्या ठिकाणी येऊन खेळला तर मोबाईल जास्तं गरम होत नाही व जर मोबाईल गरम झाली नाही तर गेम लेग होणार नाही, म्हणून थंड हवेच्या ठिकाणी गेम खेळा.

अंतिम शब्द :

आज आपण BGMI lag fix कसे करावे How to fix lag in BGMI [ Battleground mobile India ] या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतले आहे. मी अशा करतो की तुम्हाला आजचे लेख नक्कीच आवडले असेल. जर तुमच्याही कोणत्याही मित्राचा मोबाईल गेम खेळत असताना लेग होत असेल तर तुम्ही त्यांना आजचे लेख नक्की शेअर करा जेणेकरून ते सुध्दा BGMI lag fix करू शकता. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी आर्टिकल सुद्धा वाचा. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post