सिंहीण अन् कोल्ह्याचे पिल्लू तात्पर्य कथा The story of the lioness and the fox

सिंहीण अन् कोल्ह्याचे पिल्लू बोधकथा The story of the lioness and the fox

सिंहीण अन् कोल्ह्याचे पिल्लू 

एका जंगलात एक सिंहाचं कुटुंब राहात होतं. सिंह सिंहीण अन् त्यांचे दोन छावे ! - रोज जंगलात जायचं अन् शिकार करून आणायची, हे काम अर्थातच सिंहाकडे होतं.
सिंहीण मुलांचं पालन-पोषण करीत असे आणि त्यांना शिक्षण देत असे. छोटी शिकार कशी करायची ते शिकवीत असे. एके दिवशी सकाळी शिकार आणायला गेलेला सिंह संध्याकाळ झाली, तरी परत आलाच नाही. सिंहिणीला काळजी वाटू लागली.

सिंहीण अन् कोल्ह्याचे पिल्लू बोधकथा The story of the lioness and the fox

तोच सिंह आला खरा, पण... तो रोजच्यासारखा खुषीत नव्हता किंवा ही घे शिकार, करा मेजवानी ' असंही तो म्हणाला नाही. उलट स्थानं जे काही तोंडात धरून आणलं होतं, ते त्यानं अगदी हळूच सिंहिणीच्या पुढयात ठेवल अनू म्हणाला “ राणी ! आज शिकारच मिळाली नाही. मला परत येताना हे एक कोल्ह्याचे पिल्लू दिसलं. मी त्याला छोटासा जीव म्हणून न मारताच तुझ्याकडे आणलं आहे. आता तू त्याला मार अन् तुम्ही सर्वांनी खा. मी आजचा दिवस उपाशीच राहीन."

सिंहाचे ते मायाळू शब्द ऐकून सिंहीण म्हणाली " तुम्ही त्याला लेकरू म्हटलंत ना ! मग ते माझंही लेकरूच की ! मी आपल्या छाव्यांना खायला दिलंय. आपण दोघं आज उपाशी राहू, पण हे पिल्लू मारायला नको. त्याला आपल्यातच वाढवू." असं म्हणून त्या सिंहिणीनं आपलं दूध पाजून त्या कोल्ह्याच्या पिल्लाचे प्राण वाचवले. ते त्या दोन छाव्यांबरोबरच वाढू लागलं. काही दिवसांतच त्यांची छान गट्टी एकदा मात्र असं झालं की, ते तिघं जंगलात गेले असता त्यांना एक रानहत्ती दिसला.

हत्ती अन् सिंह ह्यांचं हाडवैर ! तेव्हा हत्तीला समोर पाहताच ते दोघ छावे पुढे सरसावले आणि आता हत्तीच्या गंडस्थळावर झेप घेणार, तोच कोल्ह्याचे पिल्लू म्हणाले
अरे, असं वेड्यासारखं करू नका. परत चला. तो हत्ती बतवान आहे... चला, पळा..." कोल्ह्याच्या ह्या बोलण्यानं त्या पराक्रमी सिंह छाव्यांच्या मनातही स्वतः बद्दलच शंका आली... अन् तिघेही परत आले.

त्या रात्री दोन्ही सिंहाच्या छाव्यांनी ती घटना सिंह-सिंहिणीला सांगितली. त्यावरून सिंहीण काय ते समजली. दुसऱ्या दिवशी सिंह छाव्यांना आपल्याबरोबर घेऊन गेला अन् सिंहीण त्या कोल्ह्याच्या पिल्लाला घेऊन दुसरीकडे गेली.

एका सुरक्षित जागी तिनं त्या पिल्लाला थांबवलं अन् म्हणाली, " बाबा, तुझी जात अन् त्यांची जात एक नाही. त्यांच्यासारखं तुला राहता येणार नाही. उद्या तू त्यांचीच शिकार होऊ नयेस, म्हणून सांगते, तू सिंहाचा छावा नाहीस. तू कोल्हा आहेस; पण पराक्रमी नाहीस. तू जा ..अन् आपल्या जातीच्या लोकांत सुखानं रहा. सिंहिणीनं त्याला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. मागं मागं पाहात कोल्ह्याचं पिल्लू दूर निघून गेलं.

तात्पर्य : पराक्रम हा रक्तात असावा लागतो तो सांगून सवरून अंगात आणता येत नाही. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post