दुखांच मूळ तात्पर्य कथा | दुःखाचं मूळ बोधकथा The original parable of sorrow in Marathi

दुखांच मूळ तात्पर्य कथा | दुःखाचं मूळ बोधकथा The original parable of sorrow in Marathi

दुःखाचं मूळ

एके दिवशी उगवत्या सूर्याबरोबर एक साधूमहाराज एका गावात आले. गावाजवळच्या नदीकाठी असलेल्या शिव मंदिरात त्यांनी आपल बस्तान बसवलं. देव दर्शनासाठी येणारे लोक आता देवाबरोबरच साधूच्याही पाया पडू लागले. एक-एक करत बरेच गावकरी त्या साधूकडे जमू लागले.. साधूपण त्यांना काही हितोपदेशाच्या चार गोष्टी, औषध-पाणी, मंत्र उतारे देऊ लागला. त्याबरोबर भक्तांची अन् भक्तगणांबरोबरच भेटवस्तू, फळ-फळावळ, दक्षिणा यांचीही आवक वाढली.

दुखांच मूळ तात्पर्य कथा | दुःखाचं मूळ बोधकथा The original parable of sorrow in Marathi

थोड्याच काळात त्या साधूकडे बरंच मोठं डबोलं जमा झालं. मात्र तो साधू काही कुणाला त्या धनाच्या गाठोड्याला हात लावू द्यायचा नाही. जसं धन वाढू लागलं, तसं ते सांभाळायचं कसं, ठेवायचं कुठं, अन् कसं, ह्याची चिंता साधूला सतावू लागली. एका लबाड माणसाच्या लक्षात एक गोष्ट आली, की हा साधू आपली बैठकीची अन् एक गाठोडं हे कधीच सोडत नाही. त्या गादी लोभी माणसानं एक डाव रचला. दुसऱ्या दिवशी रडत रडत येऊन त्यानं त्या साधूचे पाय धरले. "महाराज ! मी संसारतापाने पोळलो आहे. मला माझ्याच माणसानी दूर लोटलंय, मला आसरा द्या. मंत्र उपदेश द्या. माझ्या जीवनाचं कल्याण करा. मी आपल्याला गुरू मानतो. आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करा.” हे सारं काही तो माणूस इतकं रडकुंडीला येऊन म्हणाला की, ते साधूला खरं वाटलं. बरं, इतकी विनवणी करूनही त्याला जवळ न करावं, तर लोक काय म्हणतील, ह्या चिंतेनं त्या साधूनं त्या माणसाला शिष्यत्व दिलं. 'ॐ नमः शिवाय' मंत्र दिला अन् सेवेकरी म्हणून त्याला आपल्याजवळ आसराही दिला.

तो लबाड माणूस शिष्य बनून त्या सांधूजवळ राहू लागला, त्यांची सेवा करू लागला, जप करू लागला. एक नवी सोबत वाढली; पण हा नवा शिष्यच आपलं डबोलं पळवून नेणार नाही ना ? ही नवी चिंता त्या साधूला सतावू लागली. साधूची होती ती थोडीशी झोपही उडाली.

साधूनं मात्र एक केलं. खबरदारीचा उपाय म्हणून तो शिष्याला म्हणाला, "बेटा, चुकूनपण कधी ह्या गादीजवळ येऊ नकोस. हात जरी लावलास, तरी जळून जाशील."
शिष्य तयारीचाच होती. “ शिव शिव.. गुरुआज्ञेचा भंग? नाही गुरुदेव, हे कदापि होणं नाही. मी ह्या गादींच्या कधीच जवळ येणार नाही. मी लांब राहीन, बाहेरच्या ओवरीत झोपेन."तो शिष्य म्हणाला.

साधूला खूप आनंद झाला. शिष्याची नियत बदलू नये; म्हणून तो साधू त्याची मर्जी राखू लागला. पण तो शिष्य मोठा तयारीचा. तो शरीरानं लांब राहायचा अन् मनानं मात्र त्या धनाच्या गाठोड्याजवळ अन् गादीतल्या मायेच्या उबेजवळच घुटमळायचा. नजर धनावर असायची; पण आव मात्र मोठ्या निःस्पृहतेचा आणायचा. झालं ! होता होता काही महिने असेच गेले. माघ महिना आला. शिवरात्रीचा महोत्सव साजरा झाला. त्या उत्सवाच्या निमित्तानं साधूची मिळकतही वाढली. कुणी सोन्याची साखळी दिली, कुणी भरजरी वस्त्र, कुणी चांदीच्या पादुका आता मात्र साधून एक विचार मनाशी पक्का केला की, गाव सोडायचा ! अन् भर भजनात सर्व गावकऱ्यांना म्हणाला, " बाबांनो ! काल रात्रीच मला भोलेनाथांची आज्ञा आलीय. आता मला दुसऱ्या गावी जायला हवं. साधून एका ठायी जास्त दिव राहू नये असं शास्त्रही सांगतं."

झालं! साधू महाराज जाणार म्हटल्यावर भक्तांनी, भाविकांनी, गावकऱ्यांनी स झोळी भरली. एका मंगल प्रभाती साधूने प्रस्थान ठेवलं. तो शिष्य बरोबर होताच..... वाटेत नदी लागताच साधू म्हणाला, "शिष्या, मी स्नान करून येतो, तोवर तू | कपड्यांकडे लक्ष दे. कपड्याची पिशवी सोवळ्याची आहे. त्याला हात लावू नकोस,
साधू स्नानाला गेले; अन् इकडे त्या लबाड शिष्यानं सोवळ्या कपड्या लपवलेल्या धनासह पोबारा केला. साधूमहाराजांवर पश्चात्तापाची पाळी आली.

तात्पर्य : धन मिळालं तरी दुःख अन गेलं तरी दुःख. सर्व दुःखाचं मूळ हे फक्त धन, धन आणि धनच !
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post