ऑनलाईन ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कसे कमवावे|How to make money by taking online tuition classes

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, आजच्या आपल्या आर्टिकल मुळे एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य व एखाद्या शिक्षकाच्या हाता मध्ये काही पैसे येणार आहे. आजचे आपले आर्टिकल  ऑनलाईन कमाई करण्याच्या संबंधित आहे, कारण आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कसे कमवावे How to make money by taking online tuition classes. 

सध्याच्या चिंतापूर्वक असलेल्या परिस्थितीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कॉलेजेस व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, शाळा व कॉलेज बंद असल्या तरी मात्र शिक्षण काही थांबत नाही आहे, या समस्यावर निवारण करण्यासाठी प्रत्येक शाळेतील  शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस चा पर्याय निवडला आहे.  तरी मात्र काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवलेले समजत नाही आहे, अशावेळी शिक्षकांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मध्ये चेंजेस करावे लागतो, म्हणजेच त्यांना ऑनलाईन शिकवत असताना काही गमती जमती करावे लागते, विद्यार्थ्यांना आकर्षित होण्यासाठी बोलण्यामध्ये बदल करावे लागते. असे केल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये रस निर्माण होत आहे.

ऑनलाईन ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कसे कमवावे How to make money by taking online tuition classes

जसे आपल्या शाळेत शिकवलेले काहीसे समजत नसते म्हणून आपण क्लासेस जॉईन करत असतो, तसेच  ऑनलाईन पद्धतीने शिकवले समजत नसेल तर आपण ऑनलाईन असलेले क्लासेस जॉईन करू शकतो. यावरून आपल्याला असे कळते की सध्या ऑनलाईन क्लासेस ची विद्यार्थ्याना खूप गरज आहे. म्हणून तुम्ही सुद्धा एखाधे ऑनलाइन ट्युशन क्लासेस सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवू शकता, तसेच तुमची कमाई सुद्धा होऊ शकते. 

ऑनलाईन ट्युशन क्लासेस म्हणजे काय | What is online tuition classes in Marathi

सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे, कारण कोरोना चा प्रादुर्भाव रोखावा म्हणून. जसे आपण शाळेमध्ये असताना आपल्याला शाळेतील काही शिकवलेले समजत नसेल तर आपण ट्युशन क्लासेस जॉईन करून त्याद्वारे शिकत असतो, तसेच शाळेतील शिक्षकांचे ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले समजत नसेल तर, ऑनलाइन ट्युशन क्लासेस असतात, ऑनलाईन ट्युशन क्लासेस मध्ये ते शिक्षक सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिकवतात परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या शिकवण्याच्या स्टाईलमध्ये व त्यांच्या स्किल मध्ये फरक असतो. म्हणून तुम्हाला कळले असेल की ऑनलाईन ट्युशन क्लासेस म्हणजे, ऑनलाईन असलेले ट्युशन क्लासेस.

काही लोकांमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या मुलाला शिकवण्याची रस, छंद, एखाद्याला एक्सप्लेन करणे किंवा शिकवणे आवडत असते. तुम्ही तुमच्या याच छंदाला किंवा तुमच्या आवडीला पैसे कमावण्याच्या स्वरूपामध्ये रूपांतर करू शकता. कारण सध्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची खूप गरज आहे, आता शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने होत आहे, म्हणून तुम्ही सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मुलांना ट्युशन क्लासेस च्या साह्याने शिक्षण देऊ शकता, यासाठी तुम्हाला ऑनलाईन ट्युशन क्लासेस स्टार्ट करावे लागेल किंवा ते ओपन करावे लागेल.ऑनलाईन ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कसे कमवावे | How to make money by taking online tuition classes हे जाणून घेण्यासाठी पुढील पोस्ट पूर्णपणे वाचा.

ऑनलाईन ट्युशन क्लासेस चालू कसे करावे | How to open online tuition classes 

पहिले ऑफलाइन शिकवण्यासाठी आपल्याकडे एक रूम किंवा हॉल असणे अनिवार्य होते, तसे आता तुम्हाला ऑनलाईन ट्युशन क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांसाठी रूम किंवा होल असणे आवश्यक नाही आहे. कारण तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवणार आहात. म्हणून तुमची रूमची किंवा हॉलचे समस्याही मिटणार आहे. आता  सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्लासचे नाव ठरवावे लागणार आहे, त्याची तुम्हाला  ब्रॅण्डिंग किंवा जाहिरात करावी लागणार आहे. पहिले जाहिरात करण्यासाठी युजर्स गल्ली मध्ये किंवा गावांमध्ये, शहरांमध्ये बॅनर लावत असतात, परंतु आता बॅनर लावायची गरज नाही आहे कारण आता सोशल मीडियाचा वापर करोडो पेक्षा जास्त युजर्स करत आहे, या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या ऑनलाइन क्लासेसचा इमेज किंवा बॅनर सोशल मीडियावर अपलोड करून जाहिरात करू शकता. 

त्या बॅनर मध्ये तुमचा मोबाईल नंबर किंवा संपर्क साधण्यासाठी ईमेल असणे गरजेचे आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने तुमच्या ऑनलाईन क्लासेसचा बॅनर सोशल मीडियावर पाहिला तर तो तुम्हाला संपर्क साधेल त्याचे ॲडमिशन करण्यासाठी. मग तुम्हाला तुमच्या बॅचेस चे फीस ठरवावे लागणार आहे. प्रत्येक इयत्ता चे तुम्हाला टप्प्याटप्प्याने ऑनलाइन वर्ग घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सर्व बाबींचे नियोजन करावे लागणार आहे.

आता ऑनलाईन ट्यूशन क्लासेस घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ओळखीच्या काही शिक्षकांशी संपर्क करावे लागेल, तुम्हाला तुमच्या सर्व ऑनलाईन ट्युशन क्लासेस चे नियोजन त्यांना सांगायचे आहे, व त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही सुद्धा ऑनलाईन ट्युशन क्लासेस मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवणे स्टार्ट करा तेही माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला या सर्व शिक्षकांसोबत पार्टनरशिप करावी लागणार आहे, आता तुम्हाला तुमच्या सर्व शिक्षकांचे नियोजन करावे लागणार आहे की कोण कितवी च्या मुलांना शिकवणार कोण कोणते सब्जेक्ट शिकवणार. जसे जसे तुमच्या ट्यूशन क्लासेस मध्ये मुलांचे ऍडमिशन येण्यास सुरुवात होणार, तस तसे तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या पाहून येणा-या कमिशनला सर्व शिक्षकांसोबत वाटून घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

हे झालं फक्त ऑनलाईन ट्युशन क्लास घेण्याचे नियोजन, परंतु प्रश्न असा पडतो की मुलांना ऑनलाईन शिकवायचे कसे. तर मित्रांनो असे खुप सारे ॲप्स किंवा वेबसाईट आहे ज्याद्वारे तुम्ही मुलांना ऑनलाइन लाईव्ह शिकवू शकता. हो तुम्ही बरोबर ऐकले असे काही ॲप्स आहेत आणि वेबसाईट आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या किंवा मोबाइलच्या स्क्रीन द्वारे लाईव्ह अभ्यास शिकवू शकता. तर पाहूयात कोणत्या आहेत वेबसाईट्स आणि ॲप्स ज्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन लाईव्ह शिकवता येईल.

ऑनलाईन ट्युशन क्लासेस चालू करण्यासाठी काय करावे.

1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ऑनलाईन क्लासचे नाव ठरवावे लागणार आहे.

2. ऑनलाइन क्लासेसचा इमेज किंवा बॅनर सोशल मीडियावर अपलोड करून जाहिरात करणे

3. बॅचेस चे फीस ठरवणे.

4. ओळखीच्या काही शिक्षकांशी संपर्क करावे लागेल

5. ओळखीच्या शिक्षकांसोबत पार्टनरशिप करणे.

6. शिक्षकांचे नियोजन करावे लागणार आहे की कोण कितवी च्या मुलांना शिकवणार कोण कोणते सब्जेक्ट शिकवणार. 

7. येणा-या कमिशनला सर्व शिक्षकांसोबत वाटून घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

ऑनलाईन ट्युशन क्लासेस कसे घ्यावे | How to take online tuition classes 

Whatsapp massage :

आता व्हाट्सअप ॲप्स चा सर्वजण वापर करत आहेत ते लहान मुलं असो वा मोठे असो वा म्हातारपणातील व्यक्ती असो. आता व्हाट्सअप हे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण ॲप झाले आहे. कारण आता जे पण आपले काही इम्पॉर्टंट फाइल्स किंवा इम्पॉर्टंट मेसेज असो तो व्हाट्सअप द्वारे पाठवला गेला जातो. आता तुम्ही विचार करत असेल की व्हाट्सअप द्वारे मुलांना लाईव्ह अभ्यास कसा शिकवता येईल. तर व्हाट्सअप मध्ये व्हिडिओ कॉल नावाचा एक फीचर आहे, ज्या आधारे तुम्ही त्या व्यक्तीशी लाईव्ह पणे बोलू शकता. या फिचरचा वापर करून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांला लाईव्ह अभ्यास शिकवू शकता.

तसेच अभ्यासा संबंधित काही पीडीएफ किंवा इमेजेस तसेच व्हिडिओ तुम्ही व्हाट्सअप द्वारे विद्यार्थ्यांना सेंड करू शकता. तुम्ही तुमच्या ऑनलाईन क्लासेसचा एक ग्रुप तयार करून त्यामध्ये सर्व मुलांना ऍड करून त्यांना हे सर्व फाईल सेंड करू शकता. तुम्हाला कळले असेल की व्हाट्सअप द्वारे मुलांना लाईव्ह कसे शिकवावे.


Zoom cloud meetings  :

Zoom या ॲपचा वापर मोठे बिझनेस मॅन किंवा त्यांच्या कंपनी सुद्धा युज करत असतात. झूम या ॲपद्वारे तुम्ही मुलांशी व्हिडिओ कॉल द्वारे अभ्यास शिकवू शकता. झूम या ॲप मध्ये तुम्ही तुमच्या ऑनलाईन क्लासेस मधील 100 असो वा किती ही मुलांना एकाच वेळी ऑनलाइन लाईव्ह शिकवू शकता.  

zoom या ॲपचा वापर तुम्हाला तुमच्या ऑनलाईन क्लासेस मध्ये खूप उपयोगी पडणार आहे. या ॲपद्वारे तुम्ही कितीही मुलांना एकाच वेळी तेही त्यांना बघून की ते मुले कसा अभ्यास करत आहेत हे लाईव्ह पाहू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस बनवायचे असेल तर तुम्ही ऍपचा वापर नक्कीच करा व हे ॲप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.


Classroom :

क्लास रूम हे एक गुगलचे ॲप आहे, या ॲपचा वापर विद्यार्थ्यांना अभ्यासा संबंधित इमेजेस व्हिडिओज व फाइल्स सेंड करायला केला जातो. ह्या ॲप्स साठी तुम्हाला जीमेल अकाउंट तयार करावे लागते व तुमच्या ऑनलाईन क्लासेस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे जी मेल घेऊन त्यांना ह्या ॲप वर ॲड करावे लागते व तुम्ही तुमच्या क्लासचा ग्रुप तयार करू शकता.

मी तुम्हाला सांगितले वरील तीन ॲप्स हे ऑनलाईन क्लासेस साठी खूप फायदेशीर आहेत. मला जे फायदेशीर ॲप्स वाटले, मी त्यांचे पहिले वापर केला आणि ज्या ॲप मध्ये मला चांगला अनुभव भेटला त्याच ॲप ची माहिती मी तुम्हाला या आर्टिकल द्वारे प्रोव्हाइड केलेली आहे.

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या आर्टिकल द्वारे मी तुम्हाला ऑनलाईन क्लासेस संबंधित भरपूर माहिती दिली आहे. आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की ऑनलाईन ट्युशन क्लासेस घेऊन पैसे कसे कमवावे | How to make money by taking online tuition classes. मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल. तर प्लीज तुमच्या ओळखी मध्ये जर कोणी शिक्षक किंवा ज्यांना दुसऱ्यांना एक्सप्लेन किंवा शिकवण्याचा छंदा असेल अश्या व्यक्तींना आजचे आर्टिकल नक्की शेअर करा. तसेच मित्रांना जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करा, व मी काही सांगण्यामध्ये चुकी केली असेल तर तेही तुम्ही मला कमेंट द्वारे कळवा. तर पुन्हा एकदा भेटूया अश्याच आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा. नमस्कार ..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post