आयटीआर भरण्याचे फायदे | Benefits of filing ITR in Marathi

आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेणार आहोत की प्राप्तीकर विवरण म्हणजे काय | What is an ITR in Marathi व आयटीआर भरण्याचे फायदे | Benefits of filing ITR in Marathi

आयटीआर भरण्याचे फायदे | Benefits of filing ITR in Marathi

प्राप्तीकर विवरण म्हणजे काय | What is an ITR in Marathi

प्राप्तीकर विवरण म्हणजेच आयटीआर भरणे हा आर्थिक शिस्तीचा भाग आहे. या प्रा सवयीमुळे अनेक फायदे होतात. आयटीआरच्या फायद्याची माहिती फार कमी लोकांना आहे. या माध्यमातून आपल्याला व्हिसा आणि सर्वप्रकारचे कर्ज मिळण्यासह अनेक लाभ मिळू शकतात. आता २०२०-२१ साठी प्राप्तीकर विवरण भरण्यास सुरवात झाली आहे. सर्वांना ३० सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करावे लागणार आहे. वार्षिक उत्पन्न करश्रेणीत बसत नसल्याने आयटीआर भरण्याची गरज नाही, असे अनेकांना वाटू शकते. परंतु हा विचार योग्य नाही. प्राप्तीकर असो किंवा नसो, करपात्र उत्पन्न नसले तरी रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे. आयटीआर नियमित भरल्याने होणारे फायदे इथे आपल्याला सांगता येईल.

आयटीआर भरण्याचे फायदे | Benefits of filing ITR in Marathi

टॅक्स रिफंडचा दावा :

टॅक्स रिफंड क्लेम करायचा असेल तर आयटीआर दाखल करणे गरजेचे आहे. आपण जेव्हा आयटीआर भरतो, तेव्हा प्राप्तीकर खात्याकडून असेसमेंट करण्यात येते. आयटीआरची पडताळणी केल्यास रिफंडचे स्टेटस कळू शकते. दावा योग्य असेल तर प्राप्तीकर खात्याकडून खात्यात रिफंड जमा होईल. म्हणून आयटीआर भरणे आवश्यक आहे.

उत्पन्नाचा राहतो पुरावा :

एखादा व्यक्ती प्राप्तीकर विवरण भरत असेल तर त्याला फॉर्म १६ प्रमाणपत्र दिले जाते. आयटीआर भरताना फॉर्म १६ जोडण्यात येतो. आपण ज्या कंपनीत, संस्थेत काम करतो, तेथून हा फॉर्म मिळतो. याप्रमाणे संबंधित व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किती आहे, हे समजले हे एकप्रकारचे सरकारी कागदपत्र म्हणून. ओळखले जाते. प्राप्तीकर खात्याला उत्पन्नाचा स्त्रोत समजतो. या स्रोताच्या आधारे क्रेडिट कार्ड, कर्ज मिळते.

व्हिसासाठी गरजेचे :

परदेशात जात असाल तर व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. यावेळी आपल्याकडे आयटीआरची मागणी होऊ शकते. अनेक देशात व्हिसा अॅथोरिटीज व्हिसासाठी तीन किंवा पाच वर्षाच्या आयटीआरची मागणी करतात. आयटीआरच्या माध्यमातून प्रवाशाची आर्थिक पार्श्वभूमी तपासली जाते.

कर्जाची सहज उपलब्धता :

आयटीआर कागदपत्रास सरकारी आणि खासगी
पातळीवर उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य जगा धरले जाते. कर्जासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर बँकेकडून आयटीआरची मागणी होते. आपण नियमितरुपाने आयटीआर भरत असाल तर बँकेकडून सहजपणे कर्ज मिळेल. याशिवाय फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून कर्जाव्यतिरिक्त अन्य सेवा देखील मिळतात.

नुकसान कॅरी फॉरवर्ड करणे सोयीचे :

शेअर किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असेल आणि त्यात नुकसान सहन करावे लागत असेल तर या नुकसानीला पुढील वर्षात फॉरवर्ड करण्यासाठी निश्चित कालावधीत टॅक्स रिटर्न फाइल करणे गरजेचे आहे. पुढील वर्षात होणाऱ्या कॅपिटेल गेनला या नुकसानीतून अॅडजेस्ट केले जाते. त्यामुळे या लाभावर करसवलतीचा फायदा मिळू शकतो..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post