Finger Prints म्हणजे काय | What is Fingerprint in Marathi

Finger Prints  म्हणजे काय | What is Fingerprint in Marathi 


अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेक्टर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. 

Finger Prints  म्हणजे काय | What is Fingerprint in Marathi

त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, बोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे

आकार दिसतील. यांना अनुक्रमे आर्च (पद्म), लुप (शंख), व्हर्ल (चक्र) व काम्पोझिट (संमिश्र) आकार असे म्हणतात. बाह्यत्वचा व अंतःत्वचेवर असणाऱ्या उंचवटे व खोलगट भागांवर हे आकार अवलंबून असतात. हे जन्मल्यापासून दिसून येतात व आयुष्यभर बदलत नाहीत. त्वचा जर नष्ट झाली तर मात्र तेही नष्ट होतात. शंख, चक्र, पद्म व संमिश्र आकार यांच्या विविध रचना तयार होतात. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट सारखे केवळ अशक्यच असते. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असण्याची शक्यता एकास चौसष्ट हजार दशलक्ष इतकी कमी असते. म्हणजे जगाच्या तिसपट लोकसंख्येच्या तिसपट लोकसंख्येतच दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असू शकतात. 

फिंगर प्रिंट चा वापर कशासाठी केला जातो | What is Fingerprint used for 


या वैशिष्ट्यांमुळे गुन्हेगार पकडण्यासाठी ठशांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही वयात ते बदलत नाहीत. हाताच्या बोटाची त्वचा शाबूत असलेल्या मृतदेहाचेही फिंगर प्रिंट्स घेता येतात. त्यामुळे व्यक्तीची खात्रीशीरपणे ओळख पटवता येते. एवढेच नाही तर, सांकेतिक भाषेत त्यांची माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येते. साहजिकच त्यामुळे बँकेतून पैसे काढताना निरक्षर व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतात. नोकरीत कायम झालेल्या व्यक्तींच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. चोर पकडल्यावर पोलिसही त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. ओळख पटविण्यासाठी त्याचा पुढे उपयोग करतात. फिंगर प्रिंट्सच्या आधारे अनेक गुन्ह्यातील खरा गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

आज आपण काय जाणून घेतले :

मित्रांनो आजच्या पोस्ट द्वारे आपण हे जाणून घेतले आहे की Finger Prints  म्हणजे काय | What is Fingerprint in Marathi व फिंगर प्रिंटचा वापर कशासाठी करतात. मी आशा करतो की तुम्हाला आजची ही आपली जनरल नॉलेजची पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये सांगीतलेली माहीती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साइटवर असलेल्या आणखी पोस्ट चे वाचन करा 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post